
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 13) तेराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा संघ (CSK) आणि राजस्थानचा संघ (RR) आज एकमेकांना भिडणार आहे. चेन्नई संघाने या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत करत पहिला विजय मिळवला आहे. तर, राजस्थानचा संघ या हंगामात आपला पहिला सामना खेळणार आहे. मात्र, सामना सुरु होण्याआधीच राजस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानच्या संघाचा तडाखेबाज फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) कुटुंबासमवेत येथे आला असून सध्या तो क्वारंटाईन आहे. तर, राजस्थानचा संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) आधीच टीममध्ये नाही. तो टीममध्ये कधी परतेल याबाबत कोणतीही माहिती नाही. यामुळे राजस्थान संघापुढे मोठ आव्हान उभे राहिले आहे.
'दुर्दैवाने राजस्थान रॉयल्ससाठी मी पहिला सामना खेळू शकणार नाही कारण मी क्वारंटाईन कालावधी पूर्ण करतोय. याची आवश्यकता होती कारण मी येथे माझ्या कुटुंबासोबत आहे.' असे जोस बलटर म्हणाला आहे. राजस्थानच्या संघासमोर महेंद्र सिंह धोनीने नेहमी आक्रमक फलंदाजी करताना दिसला आहे. तसेच आजच्या कोणता खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभूत झाल्यानंतर सनराइजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधाराने दिली 'अशी' प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला? डेव्हिड वार्नर
संघ-
राजस्थान रॉयल-
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वि जयस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, ओशान थॉमस, अँड्र्यू टाय, डेव्हिड मिलर, टॉम कुर्रान, अनिरुद्ध जोशी , श्रेयस गोपाळ, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंग, अनुज रावत, महिपाल लोमरर, मयंक मार्कंडे
चेन्नई सुपर किंग्ज-
एमएस धोनी (कर्णधार, विकेटकिपर), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चहर, पियुष चावला, इम्रान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतूराज गायकवाड, कर्ण शर्मा