IPL क्रिकेट सामन्यातील 'या' 5 खेळाडूंना मिळू शकते World Cup चे तिकिट
Indian team (Photo: @BCCI/Twitter)

IPL 2019: येत्या 23 मार्च पासून आयपीएलच्या (IPL) क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. त्यामुळे वर्ल्ड कप (World Cup) पूर्वी सर्व भारतीय संघाचे खेळाडू त्याचे तिकिट मिळण्यासाठी खूप मेहनत प्रयत्न करत आहेत. परंतु पाच असे खेळाडू आहेत जे आपल्या खेळीतून वर्ल्ड कपचे तिकिट मिळण्यासाठी योग्य ठरु शकतात.

आयपीएलचा 12वा सीझन सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच बाकी राहिले आहेत. तर जाहीर करण्यात आलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्याच्या सूचीच एकूण 17 सामने खेळवले जाणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला त्याच्या होम ग्राऊंडवर 8 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. तर पाहूयात नेमके कोणते 5 दमदार खेळाडू आहेत ज्यांना वर्ल्ड कपचे तिकिट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा-IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील दोषी क्रिकेटर श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; आजीवन बंदीबद्दल पुर्नविचार करण्याचा BCCI ला आदेश)

दिनेश कार्तिक:

भारतीय संघातील अनुभवी विकेटकीपर दिनेश कार्तिक ह्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळवण्यात आलेल्या एक दिवशीय सामन्यात खेळण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. तर ऋषभ पंत ह्याला दिनेश कार्तिक ह्याची जागा देऊ केली होती. मात्र ऋषभ पंत ह्याने 5 एकदिवशीय सामन्यात उत्तम कामगिरी केली नाही. त्यामुळे ऋषभ पंतच्या या वाईट कामगिरीचा फायदा दिनेश कार्तिक ह्याला होऊ शकतो. त्याचसोबत जर कार्तिकने आयपीएलमध्ये आपली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडल्यास तरीही कार्तिक ह्याचे वर्ल्ड कपमध्ये नाव देण्यात येऊ शकते.

कृणाल पांड्या:

भारताच्या टी 20-20 संघाचा हिस्सा बनलेल्या कृणाल पांड्या ह्याला वर्ल्ड कपसाठी संघात सहभागी होण्याची संधी आहे. तर कृणाल पांड्या ह्याला रवींद्र जडेजा ह्याच्या वाईट कामगिरीचा फायदा होऊ शकतो. जडेजाच्या तुलनेत कृणाल उत्तम गोलंदाजी करतो.

अजिंक्य रहाणे:

4 क्रमाकावरील अंबाती रायडू ह्याचा फ्लॉप शोनंतर अजिंक्य रहाणे ह्याला वर्ल्ड कप मध्ये तिकिट मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्ल्ड कप संघात 4 क्रमांकावर असणे फायद्याचे ठरेल. तर 2015 रोजी सुद्धा अजिंक्य रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळवला गेला होता. रहाणे सारखा क्लासिकल गोलंदाज असणे फायद्याचे ठरण्याची शक्यता आहे.

पृथ्वी शॉ:

केएल राहुल याच्या खराब कामगिरीचा फायदा पृथ्वी शॉ ह्याला होऊ शकतो.ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक दिवशीय सामन्यात राहुल उत्तम कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे जर पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये चांगला खेळल्यास त्याला संघात रिजर्व्ह ओपनर म्हणून घेतले जाऊ शकते.

खलील अहमद:

वर्ल्ड कपसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र चौथ्या स्थानकावरील वेगवान गोलंदाजपटू बद्दल अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. उमेश यादव याची खेळी उत्तम न राहिल्यास खलील अहमद ह्याला संधी उपलब्ध होऊ शकते. तसेच भारतीय संघाला एका वेगळ्या पद्धतीची खेळी करणारा खेळाडू मिळू शकतो.

IPL 12 व्या सीझनच्या पहिल्या दोन आठवड्यांचं वेळापत्रक जाहीर केल्याप्रमाणे पहिला सामना महेंद्र सिंग धोनीच्या (M S Dhoni) चैन्नई सुपरकिंग (Chennai Super Kings) विरूद्ध विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरू ( Royal Challengers Bangalore ) मध्ये पहिला सामना रंगणार आहे.