भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Image: PTI/File)

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीचा आज 30 वा वाढदिवस आहे. आपल्या 10 वर्षांच्या कारकर्दीत विराटने यशाचे अनेक टप्पे गाठले आहेत. खेळाबरोबरच विराट त्याच्या हटके स्टाईलमुळेही खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील विराट खूप अॅक्टीव्ह असतो. त्याचबरोबर विरुष्काच्या जोडीची ही कायम चर्चा असते. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया विराटबद्दल काही खास गोष्टी...

# विराट कोहलीचा जन्म दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 5 नोव्हेंबर 1988 मध्ये झाला. विराटचे आजोबा मध्यप्रदेशातील कटनीत राहत होते. पण त्यानंतर विराटचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले.

# विराटचे टोपणनाव चिकू आहे. दिल्लीतील त्याचे कोच अजित चौधरी यांनी विराटला हे नाव दिले आहे. विराटने जेव्हा दिल्लीतील रणजी टीम जॉईन केली तेव्हा तो चीकू नावाचे कॉर्टून कॉमिक्स वाचत असे. त्यामुळे त्याचे कोच अजित यांनी विराटला चीकू बोलायला सुरुवात केली.

# 2006 मध्ये विराटच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा विराट रणजी खेळत होता. वडीलांच्या निधनापूर्वी एक दिवस विराट कोहलीने कर्नाटकविरुद्ध 90 धावांची खेळी केली होती.

# विराटने एका मुलाखतीत सांगितले होते की, करिश्मा कपूर त्याचे क्रश आहे.

# विराटला टॅटूचे भयंकर वेड आहे. विराटच्या अंगावर 8 पेक्षा अधिक टॅटूज आहेत आणि त्याचे वेगवेगळे अर्थ देखील आहेत.

# विराटने 216 वनडे सामन्यात 10232 धावा केल्या आहेत. तर 73 कसोटी सामन्यात 6331 धावा केल्या असून 62 टी20 सामन्यात 2102 धावा केल्या आहेत. 163 आयपीएलच्या सामन्यात विराटने 4948 धावांचा टप्पा गाठला आहे.

# फक्त 10 वर्षांच्या करिअरमध्ये विराट सर्वाधिक शतकं करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. 216 वनडे सामन्यात 38 शतकं आपल्या नावे करत विराटने सचिन तेंडूलकरचा रेकॉर्ड तोडला आहे.

# 2008 मध्ये विराट अंडर 19 टीमचा कर्णधार होता. त्यावेळेस अंडर 19 टीमने वर्ल्ड कपही जिंकला होता.