Indian Cricket Team: दुखापतीने खराब केला ‘या’ मुंबईकर फलंदाजांचा खेळ, अन्यथा आज आज असता टी-20 संघाच्या कर्णधार पदाचा प्रबळ दावेदार
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

विराट कोहली (Virat Kohli) टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेनंतर भारतीय टी-20 संघाचा (India T20 Team) कर्णधार म्हणून पायउतार होणार असल्याची धक्कादायक घोषणा केली. अशा स्थितीत विराटनंतर आता संघाच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या हाती जाणारा याबाबत सर्वांमध्ये उत्सुकता लागून आहे. टीम इंडियाच्या मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या या पदाचा प्रबळ दावेदार आहे. मात्र केएल राहुल, रिषभ पंत यांच्यासारखे युवा खेळाडूही रोहितला संघाच्या या उच्च पदासाठी टक्कर देत आहेत. मुंबईचा फलंदाज श्रेयस अय्यर  (Shreyas Iyer) देखील या यादीत सामील झाला असता पण यंदा मार्च महिन्यात झालेल्या दुखापतीने सर्व गणित बिगडवले. श्रेयसला इंग्लंडविरुद्ध मर्यादित ओव्हर मालिकेत दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती. यामुळे श्रेयसला आयपीएल (IPL) 2021 च्या पहिल्या टप्प्यातूनही बाहेर बसावे लागले होते. अशा स्थितीत दुखापतीने अय्यरला टीम इंडिया (Team India) टी-20 कर्णधारपदाच्या दावेदारांच्या लिस्टमधून बाहेर काढले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. (Rohit Sharma टी-20 कर्णधार झाल्यानंतर ‘हे’ 3 स्टार खेळाडू असतील उपकर्णधार पदाचे प्रबळ दावेदार, पाहा शर्यतीत कोणाचा समावेश)

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडला होता, पण आता 26 वर्षीय खेळाडू तंदुरुस्त होऊन आयपीएलमध्ये परतणार आहे. अय्यरला 2018 च्या आयपीएल लिलावात दिल्ली डेअरडेव्हिल्सने कायम ठेवले होते. त्याच हंगामात गौतम गंभीरने मध्यावरच कर्णधारपद त्यागल्यावर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा नवीन कर्णधार म्हणून श्रेयसच्या नावाची घोषित केली. त्यानंतर श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने आयपीएल 2020 च्या मोसमात अंतिम फेरी गाठली. 2021 आयपीएलमधून अय्यर बाहेर पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने यष्टीरक्षक फलंदाज पंतकडे कर्णधारपद सोपवले. तथापि, अय्यरच्या पुनरागमन झाल्यावरही दिल्लीने पंतकडे दिल्लीचे कर्णधारपद कायम राहील अशी घोषणा केली. दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर बसल्यामुळे पंतला आयपीएल 2021 च्या सुरुवातीला दिल्लीचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. पंतच्या नेतृत्वात दणक्यात सुरुवात केली आणि सध्या आठ सामन्यांत 12 विजय व दोन पराभवांसह ते 12 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. कोरोनामुळे स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर अय्यरला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ मिळाला.

दुसरीकडे, आयपीएल 2021 नंतरही रिषभ पंतच दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार म्हणून धुरा सांभाळेल याची शक्यता आहे. पंतच्या नेतृत्वात दिल्ली यंदा आयपीएलचा विजेता ठरतो की नाही यावरही हे अवलंबून आहे.