भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) गुरुवारी टीम इंडियाच्या टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) नवीन टी-20 संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. टी-20 विश्वचषक 2021 नंतर कोहली या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल. प्रत्येक कर्णधाराच्या आगमनाने संघात मोठे बदल घडतात. टीम इंडियामध्ये (Team India) असे 3 खेळाडू आहेत, जे रोहित शर्मा टी-20 कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपदाचे दावेदार असतील. आणि पीटीआयच्या एका ताज्या अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की भारतीय टी-20 संघाच्या उपकर्णधार पदासाठी बोर्ड तीन नावांवर विचार करत आहे. रोहित शर्माने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केएल राहुल, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह उपकर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहेत. (Virat Kohli नंतर टीम इंडियाचा T20 कर्णधार कोण बनणार? Rohit Sharma च नाही तर या खेळाडूंमध्येही आहे भरपूर दम)
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टी-20 फॉरमॅटमध्ये उपकर्णधार पदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. बुमराह टेस्ट, वनडे आणि टी-20 या तीनही प्रकारांमध्ये टीम इंडियाचा मुख्य सदस्य आहे. बुमराह स्वत:ला टी 20 उप-कर्णधाराच्या भूमिकेत सिद्ध करू शकतो. आयपीएलमध्ये सोबत खेळत बुमराह आणि रोहितमध्ये चांगले समन्वय देखील आहे. त्यामुळे बीसीसीआय बुमराहला टी-20 मध्ये पुढील उपकर्णधार बनवू शकते.
रिषभ पंत (Rishabh Pant)
रोहित टी -20 कर्णधार झाल्यानंतर पंत टीम इंडियाचा पुढील टी 20 उपकर्णधार होऊ शकतो. पंतने गेल्या काही महिन्यांत टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे आणि याच कारणामुळे त्याचे स्थान तिन्ही फॉरमॅटमध्ये निश्चित झाले आहे. पंतचे स्मार्ट आहे आणि कर्णधार होण्यासाठी सर्व गुण पंतमध्ये आहेत. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार असताना पंतने उत्तम कामगिरी केली आहे.
केएल राहुल (KL Rahul)
राहुल देखील या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या उपकर्णधार पदाची धुरा सांभाळण्याचा दावेदार आहे. राहुल उपकर्णधाराच्या भूमिकेसाठी सज्ज आहे. तसेच त्याने नुकतंच इंग्लंडमध्ये चांगली फलंदाजी केली होती. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएल आणि 50 षटकांच्या क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करत आहे. अशा स्थितीत त्याला उपकर्णधार बनवले जाऊ शकते. आयपीएलमध्ये राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार आहे, राहुलसाठी आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून जेतेपद पटकावण्याचे खाते अद्याप उघडलेले नाही.