आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसत आहे. भारताचा अर्धा संघ माघारी गेला आहे. भारत स्कोर 59/5 (12 ओव्हर)
INDW vs AUSW, Women's T20 World Cup Final Live Updates: आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाची पकड मजबूत; भारताचा अर्धा संघ तंबूत
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम लढत होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे एकमेकांशी भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज दुपारी 12. 30 वा. सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताची खेळाडू हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 'अ' गटातील चारही सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. तसेच भारतीय महिला संघाने विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषकाचा किताब जिंकावे, अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाने ऑस्टेलियाच्या संघाचा पराभव केला होता.
आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात भारतीय महिला संघांने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारतीय संघाला विश्वचषक नावावर करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची गरज आहे. भारताने याआधी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा पराभव करत इथवर मजल मारली. भारताने विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मात्र, अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला पात्र ठरवण्यात आले होते. तसेच पूर्वीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. भारतीय संघ अ गटात टॉपवर होता. त्याचाच फायदा आज भारतीय संघाला झाला. आता भारतासमोर सहा वेळा फायनमध्ये प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान आहे. भारताने पहिल्यादांच विश्वचषकात प्रवेश केला आहे. तसेच भारतीय महिला संघाने आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 चा किताब जिंकावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), शाफली वर्मा, स्मृती मंधाना, जेमीमह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्रकर, हरलेहाती रेड्डी, रिचा घोष
ऑस्ट्रेलिया: मेग लॅनिंग (कर्णधार), एलिसा हेली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, रॅचेल हेन्स, अॅशलेग गार्डनर, सोफी मोलिनेक्स, निकोला कॅरी, जेस जोनासेन, जॉर्जिया व्हेरहॅम, डेलिसा किमिन्स, मेगन शुट,