टीम इंडियाचे फिल्डिंग कोच आर श्रीधर यांचा खुलासा, कोण आहे मागील दशकातील सर्वोत्कृष्ट भारतीय क्षेत्ररक्षक, वाचा सविस्तर
(Photo Credits: Twitter / @BCCI)

भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये केली जाते. 2009 मध्ये भारता (India) कडून पदार्पण करणारा जडेजा मागील बर्‍याच काळापासून संघाच्या आत-बाहेर करत होता. पण, आता त्याने पाहिलं वर्षांपूर्वी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. 2015 आणि 2019 विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. यंदाच्या विश्वचषकात जडेजाला काही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, पण ती त्याने हातून जाऊ दिली नाही आणि आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (R Sridhar) यांचा असा विश्वास आहे की जडेजा मागील 10 वर्षात भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे. जगभर खेळणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये अनेक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. जडेजा व्यतिरिक्त आर श्रीधर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांना अव्वल 4 क्षेत्ररक्षक मानतात. (Dhoni चा अखेरचा सामना खेळून झालाय का; MSK Prasad ने केलं हे मोठं विधान)

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर म्हणाले, "जड्डूची मैदानावर उपस्थिती टीम चेतना वाढवते. तो अशा प्रकारचा खेळाडू आहे जो आपल्या क्षेत्ररक्षणाने विरोधी संघाला सतर्क ठेवतो. मला फार दूर जायला आवडणार नाही, पण जाडेजा गेल्या दशकात भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्रर ठरला आहे." बदलांविषयी बोलताना श्रीधर मानसिकता आणि सुधारित फिटनेसविषयी बोलले- दोन आवश्यक घटक जे भारतीय क्रिकेटमधील या क्षेत्ररक्षण क्रांतीसाठी महत्वाचे ठरले आहे. श्रीधर म्हणाले, “बदल दोन क्षेत्रात झाला आहेः मानसिकता आणि फिटनेस. मानसिकतेत बदल करणे हे संघांना काय साध्य करायचे आहे यासंबंधी आहे आणि तंदुरुस्ती त्यातील एक महत्त्वाचा भाग होता."

भारतीय क्रिकेट संघ मागील काही महिन्यांपासून चांगला खेळ करत आहे. यात त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजी व्यतिरिक्त त्यांच्या फिल्डिंगने महत्वाचे योगदान दिले आहे.