ICC Women's Rankings: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात शानदार कामगिरीनंतर भारताची धडाकेबाज महिला फलंदाज शेफाली वर्माने (Shafali Verma) फलंदाजांच्या टी-20 क्रमवारीत पुन्हा एकदा पहिला नंबर एक फलंदाजाचा स्थान मिळवला. वर्माने सहा चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 31 चेंडूत 47 चेंडूंत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या चेंडूवर 159 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहा गडी राखून विजय मिळवला आणि मालिका खिशात घातली. रोहतकची 17 वर्षीय खेळाडू आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखली जाते आणि गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक होती. संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताकडूनपाच डावात सर्वाधिक 163 धावा केल्या. (India Women Vs South Africa Women 2nd T20I: भारतीय महिला संघाने टी-20 मालिका गमावली; दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत विजय)
इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियन अलिसा हेलीसह शफालीने स्पर्धेत संयुक्त सहा षटकार लगावले. वर्माने संपूर्ण टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 158.25 स्ट्राईक-रेटने धावा केल्या. दुसरीकडे, भारतीयांमध्ये स्मृती मंधाना आणि जेमिमह रॉड्रिग्स अनुक्रमे 7व्या आणि 9व्या स्थानावर कायम आहेत. गोलंदाजीच्या क्रमवारीत दीप्ती शर्मा 7व्या आणि राधा यादव 8व्या स्थानी आहे. अष्टपैलू क्रमवारीत दीप्तीला एका स्थानाचा फायदा झाला असून ती सध्या चौथ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेची ओपनर लिझेल ली हिला टी-20 क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असला तरी वनडे क्रमवारीतील तिने आपले अव्वल स्थान गमावले आहे. लीला तीन स्थानांचा फायदा झाला असून तिने टी-20 फलंदाजांच्या यादीत 11वे स्थान मिळविले आहे. लीने दुसऱ्या टी-20 सामन्यात 70 धावांची निर्णायक खेळी करत संघाला तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली.
Look who's back on 🔝
India opener @TheShafaliVerma regains the No.1 spot in the @MRFWorldwide ICC Women's T20I Rankings.
Full list: https://t.co/py2wQA3VZq
— ICC (@ICC) March 23, 2021
दुसरीकडे, वनडे क्रमवारीत देखील मोठे बदल झाले आहेत. मेरीझान कॅपने गोलंदाजांमध्ये चौथ्या स्थानावर वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलरला मागे टाकून ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीच्या नेतृत्वात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानावर मिळवले आहे. भारताकडून कर्णधार मिताली राज 79 नाबाद खेळीनंतर आठव्या स्थानी पोहचली आणि प्रिया पुनियाने पाच स्थानांची झेप घेत 53वे स्थान गाठले. शिवाय, भारताविरुद्ध 4-1 अशा मालिका विजयानंतर आयसीसी महिलांच्या वनडे टीम रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला मागे टाकत दुसर्या स्थानी झेप घेतली तर भारत चौथ्या स्थानावर कायम आहे.