South Africa Beats India: भारतीय महिला संघ विरुद्ध लखनऊ येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवला आहे. या विजयासह दक्षिण अफिकेच्या संघाने 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिश्यात घातली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर 151 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लखनऊ येथील श्री अटल विहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानात दुसरा टी-20 सामन्यात खेळण्यात आला होता. या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर 159 धावांचे लक्ष्य ठेवले. भारतीय सं घाकडून शेफाली वर्माने 31 चेंडूत 47 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 2 षटकारचा समावेश आहे. तर, ऋचा घोषने 26 चेंडूत 8 चौकारच्या मदतीने 44 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून नॉनकुलुलेको मलाबा, शबनीम इस्माईल, नादिन डी क्रॅलेक आणि अॅनी बोश यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली आहे. हे देखील वाचा- England's ODI Squad Against India: भारत विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; जोफ्रा आर्चर संघाबाहेर
ट्वीट-
2nd T20I. It's all over! South Africa Women won by 6 wickets https://t.co/FSAs6KLOuS #INDWvSAW @Paytm
— BCCI Women (@BCCIWomen) March 21, 2021
भारतीय संघाने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून लिझेल ली 45 चेंडूत 70 सर्वाधिक धावा केल्या. तर, लॉरा व्होल्वार्डने 39 चेंडूत 53 धावा ठोकल्या आहेत. भारताकडून राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, हरलीन देऑलने या तिघांना प्रत्येक एक विकेट्स मिळला आहे.