
चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण भारताला हादरून सोडले आहे. देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. परिणामी, भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमियर लीगचा 13 हंगाम यंदा युएई खेळवण्यात येत आहे. एवढेच नव्हेतर, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रेक्षकांनाही मैदानात प्रवेश नाकारण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील प्रेक्षक दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहाने या आयपीएल आनंद घेताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि शाहरूख खान (Shahrukh Khan) यांचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात विराट कोहली शाहरूख खानशी मैदानातच भिडताना दिसत आहे. परंतु, यात काही तथ्थ नसून त्यावेळी शाहरूख खान विराट कोहलीचे कौतूक करण्यासाठी मैदानात आला होता.
नुकताच फिल्म फेअरने आपल्या अधिकृत ट्विटल हॅंडलवरून आयपीएलमधील एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर विराट कोहली आणि शाहरूख खानचे भांडण झाले होते की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, रॉयल चॅलेंजर बंगळरू विरुद्ध कोलकाता नाईट राईडर्स यांच्यातील सामना संपल्यानंतर शाहरूख खान विराट कोहलीचे कौतूक करण्यासाठी मैदानात गेला होता. मात्र, त्याच क्षणी काढलेल्या या फोटोमधील हावभाव वेगळी दिसत असल्यामुळे अनेकांच्या भुवया काही क्षणांकरीता उंचावल्या गेल्या आहेत. हे देखील वाचा- RR Vs CSK, IPL 2020 : सामना सुरु होण्याआधीच राजस्थान रॉयलच्या संघाला मोठा झटका; चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिल्या सामन्यात नाही खेळणार 'हे' 2 दिग्गज खेळाडू
फिल्म फेअरचे ट्विट-
When King Khan met King Kohli! Here's a candid throwback picture of #ShahRukhKhan and #ViratKohli from #IPL. pic.twitter.com/RR9EORZLDT
— Filmfare (@filmfare) September 22, 2020
यंदाच्या आयपीएल हंगामात विराट कोहलीचा नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्सने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी बजावली आहे. ज्यामुळे सनराइजर्स हैदराबादच्या संघाला 10 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. दरम्यान या विजयामुळे कर्णधार विराट कोहलीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.