Photo Credit- X

India Women U19 vs Bangladesh Women U19 Toss Delayed: आयसीसी अंडर 19 महिला टी20 विश्वचषक 2025 चा सुपर सिक्सचा सहावा सामना आज म्हणजेच 26 जानेवारी रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश महिला (IND vs BAN) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना क्वालालंपूरमधीलयेथे खेळला जाईल. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. भारताने गट सामन्यातील सर्व सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघानेही आतापर्यंत संमिश्र कामगिरी केली आहे. बांगलादेशने ग्रुप डी मध्ये 3 पैकी 3 सामने जिंकले आणि पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिले.(IND vs BAN ICC Under 19 Womens T20 WC 2025 Super Six Live Streaming: सुपर सिक्सचा सहावा सामना आज टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये, भारतात लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या)

सामना कधी खेळला जाईल?

आयसीसी अंडर 19 महिला टी 20 विश्वचषक 2025 चा सहावा सामना भारत महिला आणि बांगलादेश महिला संघांमध्ये रविवारी 26 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे खेळला जाणार होता. मात्र, ओल्या मैदानामुळे अद्याप नाणेफेकही झालेली नाही. त्यामुळे सामना रखला आहे.

भारत आणि बांगलादेशमधील सामना कुठे पहाल?

आयसीसी अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक 2025 च्या भारत महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील सुपर सिक्सचा सहावा सामना भारतातील टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. तर लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारत महिला संघ: जी. कमलिनी (यष्टीरक्षक), निकी प्रसाद (कर्णधार), गोंगाडी त्रिशा, सानिका चालके, भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम एमडी शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा, दृथी केसरी, आनंदिता किशोर, सोनम यादव

बांगलादेश महिला संघ: झुआरिया फिरदौस (यष्टीरक्षक), सुमाया अख्तर (कर्णधार), सुमाया अख्तर, फहोमिदा चोया, सादिया इस्लाम, आफिया आशिमा, जन्नतुल मौआ, सादिया अख्तर, हबीबा इस्लाम पिंकी, निशिता अख्तर निशी, अनीसा अख्तर सोबा, मोसममत. इवा, फारिया अख्तर, फरजाना इस्मिन, अरविन तानी, माहरुन नेस्सा