IND vs WI, ICC World Cup 2019: मोहम्मद शमी ने केले शेल्डन कॉटरेल च्या मिलिट्री स्टाइल सैल्यूट चे अनुकरण; विराट, चहल ला हसू अनावर झाले (Video)
(Photo Credit: ICC Video Grab)

इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) चा गोलंदाज शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell) आपल्या आगळ्या-वेगळ्या सेलिब्रेशन साठी चांगलाच चर्चेत राहिला आहे. प्रत्येक विकेट घेतल्यावर कॉट्रेल लष्कराच्या जवानासारखा सल्यूट करून सेलिब्रेशन करतो. त्याची ही स्टाईल अनेक जणांच्या ध्यानी-मणी उतरली असून अनेक त्याची जण कॉपी करत आहेत. (India vs West Indies, ICC World Cup 2019: मॅन्चेस्टरमध्ये भारता चा भेदक मारा, वेस्ट इंडिज चा 125 धावांनी धुव्वा; पुन्हा चमकले टीम इंडिया चे बॉलर्स)

भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज मॅचमध्ये भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने त्याच्या या स्टाईल चे अनुकरण केले. शमी ने आपली एक विकेट सेलीब्रेट करण्यासाठी कॉटरेलच्या मिलिट्री स्टाइल सैल्यूट केले. शमीच्या या कृत्याने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) ला हसू अनावर झाले. पहा हा व्हिडिओ:

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना कोहली आणि एम एस धोनी (MS Dhoni) च्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 268 धावा केल्या. त्यानंतर भारताने गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) ला लवकर बाद केलं. विश्वकपमधील पदार्पणाच्या सामन्यातच हॅट्ट्रिक घेणाऱ्या शमीने वेस्ट इंडिजचे चार फलंदाज बाद केले.

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची 27 षटकात 7 बाद 107 अशी अवस्था झाली होती. भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. मात्र, फलंदाजीमध्ये कोहली वगळता इतर वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्यासमोर फार काळ टिकू शकले नाहीत. सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) फक्त 18 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि के. एल राहुल (KL Rahul) ने डाव सावरला. पण राहुल 48 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या धोनीची सुरुवात अडखळत झाली. त्याला 8 धावांवर असताना जीवदान मिळाले.

भारताचा पुढील सामना यजमान इंग्लंडशी 30 जूनला होईल.