(Photo Credits: Getty Image)

टीम इंडिया (Team India) ने विश्वकप मध्ये वेस्ट इंडिज (West Indies) संघाचा धावांनी पराभव केला. 269 धावांचा पाठलाग करत वेस्ट इंडिज संघाला 143 इतकीच मजल मारता आली. सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात कोहलीने 72 धावांची तर, एम एस धोनी (MS Dhoni) नं अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) 18 धावांवर बाद झाला. त्यांनंतर के. एल राहुल (KL Rahul) 48 धावांवर बाद झाला. वेस्ट इंडिज विरोधात 37 धावांची खेळी करत विराटनं 20 हजार धावांचा टप्पा पार केला. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. (IND vs WI, ICC World Cup 2019: शाय होप नं उडवली होती झोप, 'बॉल-बॉल' वाचला धोनी Video)

भारताने आपल्या गोलंदाजी ची चांगली सुरुवात केली. मोहम्मद शमी (Mohammed Shami) ने ख्रिस गेल (Chris Gayle) आणि शाई होप (Shai Hope) ला माघारी धाडलं. त्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ने सुनील अॅम्ब्रिस (Sunil Ambris) ला आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने निकोलस पूरन (Nicholas Pooran) ला बाद करत वेस्ट इंडिज संघाला मुश्किलीत पडले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने कार्लोस ब्रेथवेट (Carlos Brathwaite) आणि फॅबियन अॅलन (Fabian Allen) ला सलग दोन चेंडूवर बाद केले. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात अखेरपर्यंत झुंज दिलेल्या ब्रेथवेट ला बाद करून बुमराहने भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. भारतासाठी शमी ने 4 विकेट्स घेतल्या. बुमराह आणि चाहूल ने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर कुलदीप आणि हार्दिकने 1-1 विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाने भारतीय संघाने विश्वकप मधील आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडिया चा पुढील सामना यजमान इंग्लंड (England) शी 30 जूनला होईल. इंग्लंडची हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. तर भारताने हा सामना जिंकल्यास ते सरळ सेमीफायनल मध्ये पोहचतील.