(Photo Credits: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध अर्धशतकी खेळी केली. सामन्यात पुन्हा एकदा धोनीच्या संथ खेळीवरून त्याची टीका केली जात होती. सामन्यात जरी त्याने धीमी सुरुवात केली असली तरी त्याने 61 चेंडूत 3 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्याने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सोबत 60 धावांची भागिदारी केली. धोनीला आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान दोन जीवदान ही मिळाले. (IND vs WI, CWC 2019: ख्रिस गेल च्या शानदार फील्डिंग ने विराट कोहली इंप्रेस; सोशल मीडियावर ही कौतुकांचा वर्षाव, पहा Video)

33 व्या षटकानंतर भारताच्या 4 बाद 154 धावा झाल्या होत्या. त्यावेळी धोनी आणि विराट मैदानात होते. वेस्ट इंडिजचा गोलंदाज अॅलनच्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याच्या नादात धोनी यष्टीचित झाला असता. मात्र, शाय होपच्या हातातून चेंडू दोनदा सुटला आणि धोनी बाद होता होता वाचला.

या आधी अफगाणिस्तान विरुद्ध धोनीने 52 चेंडूत 28 धावा केल्या. राशिद खानच्या चेंडूवर पुढे जाऊन खेळण्याच्या नादात धोनी राशिदच्या जाळ्यात अडकला आणि यष्टीचित झाला. त्याच्या कारकिर्दीत फक्त दुसऱ्यांदा तो बाद झाला आहे. याआधी तो 2011 मध्ये वर्ल्ड कपमध्येच बाद झाला होता. दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध, शेवटच्या षटकात धोनीने जोरदार फटकेबाजी करत दोन षटकार आणि एक चौकार मारला.