भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील टेस्ट मालिका रंगतदार बनत चालली आहे. विंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी अर्धशतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला 297 धावांपर्यंत मजल मारली. रहाणेने 81 तर जडेजाने 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 94व्या ओव्हरमध्ये जडेजानं 100 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवसाची सुरुवात जडेजा आणि रिषभ पंत यांनी केली. मात्र, पंतचा जास्त काळ जडेजाला साथ काळ देऊ शकला नाही आन 24 धावा करत बाद झाला. त्यानंतर जडेजा आणि इशांत शर्मा यांनी 60 धावांची भागिदारी केली, आणि भारताचा डाव सावरला. दरम्यान, याआधी टॉस जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डर याचा हा निर्णय विंडीज गोलंदाजांनी सार्थ ठरवलं. विंडीज गोलंदाजांनी भारताची एकेकाळी 3 बाद 25 अशी अवस्था केली होती. मयंक अग्रवाल 5 धावा, चेतेश्वर पुजारा 2 धावा आणि कर्णधार विराट कोहली 9 धावांवर बाद झाले. पण राहणे, के एल राहुल आणि जडेजाने सावध खेळी करत भारताचा डाव सावरला. (IND vs WI 1st Test Day 2: जसप्रीत बुमराह याने इतिहास रचला, टीम इंडियासाठी 'ही' कामगिरी करणारा ठरला तिसरा सर्वात वेगवान गोलंदाज)
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
दुसऱ्या दिवसअखेर विंडीजनी 8 बाद 189 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडियासाठी इशांतने 5 विकेट घेतल्या तर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. यासह गोलंदाजांनी भारताला दुसऱ्या दिवसा खेर 108 धावांची आघाडी मिळवून दिली. पहिली टेस्ट मॅच अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर हा सामना खेळली जात आहे.
भारत आणि विंडीजमधील टेस्ट मालिकेसह दोन्ही संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू झाला. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंका 60 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतल्याने ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने देखील आपले खाते उघडले. ते 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.