वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध टी-20 आणि वनडे मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटीतही आपले वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज आहे. भारत (India) आणि विंडीजमधील 2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेला 22 ऑगस्ट पासून सुरुवात झाली. यात जेसन होल्डर याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचा परिणामदेखील त्यांच्या बाजूने लागताना दिसला. विंडीज गोलंदाजांनी 25 धावांवर 3 विकेट घेत संघाला चांगली सुरुवात करून दिली. विंडीजसाठी केमार रोच (Kemar Roach) याने पहिल्या दिवसाखेर सर्वाधिक ३ गाडी बाद केले. पहिल्या दिवशी पावसाने अनेक वेळा व्यत्यय आणला. त्यामुळे फक्त 68.5 ओव्हरपर्यंत खेळ होऊ शकला. दिवस संपेपर्यंत टीम इंडियाने 6 विकेट गमावत 203 धावा केल्या होत्या. भारतासाठी अजिंक्य रहाणे एकाकी झुंज देत राहिला. त्याला अन्य कोणत्याही खेळाडूंकडून मोठी खेळी करण्यासाठी साथ मिळाली नाही. राहणे 81 धावा करत बाद झाला आणि मात्र, 19 धावांनी त्याचे शतक हुकले. (IND vs WI 1st Test Day 1: रविचंद्रन अश्विन याला Playing XI मधून वगळल्याने भडकले नेटिझन्स, म्हणाले ही सर्वात 'विचित्र निवड')
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
भारत आणि विंडीजमधील टेस्ट मालिकेसह दोन्ही संघाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी प्रवासही सुरू झाला. पहिली टेस्ट मॅच अँटिगुआ येथील नॉर्थ साऊंडच्या व्हिव रिचर्ड्स मैदानावर हा सामना खेळली जात आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील हा पहिला सामना आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत आतापर्यंत तीन कसोटी सामने झाले. त्यात श्रीलंका 60 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतल्याने ते 32 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहिल्याने इंग्लंडने देखील आपले खाते उघडले. ते 8 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
असा आहे भारतीय संघ:
भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), मयांक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.