टी-20 आणि वनडे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ टेस्ट मालिकेसाठी सज्ज आहे. टेस्ट क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी आयसीसीने जागतिक टेस्ट अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. याआधी टी-20 आणि वनडे मालिका जिंकल्यावर आता सर्वांचे लक्ष टीम इंडियाच्या टेस्ट क्रिकेटमधील खेळीवर असणार आहे. विंडीजविरुद्ध टेस्ट सामन्याआधी भारतीय संघाने विंडीज ए संघाविरुद्ध सराव सामन्यात भाग घेतला होता. यात, टेस्ट तज्न चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, इशांत शर्मा यांनी आपला दम दाखवला. त्यामुळे आता विंडीज विरुद्ध पहील्या टेस्ट सामन्यासाठी कोणाला कोणत्या क्रमांकावर स्थान मिळते यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिजमधील पहिल्या टेस्टचा पहिला दिवसाचा सामना तुम्ही ऑनलाइन Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD आणि SonyLiv Online वर पाहु शकता.
दुसरीकडे, भारतविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत पराभवाचा सामना केल्यानंतर टेस्ट मालिकेत विंडीज संघ चांगली कामगिरी करत भारताला तगडे आव्हान देण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरतील. टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. भारत-विंडिजमधील दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
भारतीय संघ: विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, मयंक अग्रवाल, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव.
वेस्ट इंडिज संघ: जेसन होल्डर (कॅप्टन), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शामार्ह ब्रुक्स, जॉन कॅम्बेल, रोस्टन चेस, रकीम कॉर्नवाल, शेन डोवरिच, शॅनोन गॅब्रीएल, शिमरोन हेटमायर, शाय होप, किमो पॉल आणि केमार रोच.