भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात 3 सामन्यांची टी -20 मालिका 6 डिसेंबरपासून सुरू होईल. मालिकेचा पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. यापूर्वी टीम इंडियाने ऑगस्टमध्ये विंडीजचा दौरा केला होता आणि 3 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली होती.त्यापूर्व,नोव्हेंबरमध्ये विंडीजला भारतीय संघाकडून 3-0 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघातील यंदाच्या दौऱ्याची सुरुवात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेपासून होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरू होईल, तर टॉस सायंकाळी साडेसहा वाजता होईल. विंडीजविरुद्ध मालिकेसाठी सर्वामध्ये लक्ष असेल ते कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याकडे. दोघेही फलंदाज टी-20 मध्ये एकमेकांच्या वरचढ राहण्याचा प्रयत्न करतील. (IND vs WI 1st T20I: केएल राहुल कडे मोठी कामगिरी करण्याची उत्तम संधी; रोहित शर्मा, विराट कोहली सह या Elite लिस्टमध्ये होणार समावेश)
भारत आणि वेस्ट इंडीज संघातील टी-20 मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. स्टार स्पोर्ट्स 1 वर इंग्रजी आणि स्टार स्पोर्ट्स 1 वर हिंदी भाषेत आपण या सामन्याचे आनंद लुटू शकतात. यासह, आपण होस्टारवर सामन्याचा लाईव्ह स्ट्रीमिंगदेखील पाहू शकता.
वेस्ट इंडिज मालिकेआधी टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला आहे. सलामी फलंदाज शिखर धवन याला दुखापत झाल्याने त्याला टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून संजू सॅमसन याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, सॅमसनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल. संजूने 2015 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून पाहिलं आणि अंतिम टी-20 सामना खेळला होता. त्यानंतर संजूची संघात निवड होऊनही त्याला प्लेयिंगमध्ये संधी मिळाली नाही. असे आहे भारत आणि विंडीज संघ:
भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, मनीष पांडे, केएल राहुल, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, दीपक चहर, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
वेस्ट इंडीज: किरोन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, शेल्डन कोटरेल, शिमरोन हेटमेयर, जेसन होल्डर, ब्रॅंडन किंग, एव्हिन लुईस, किमो पॉल, खेरी पियरे, दिनेश रामदिन (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, लेन्डल सिमन्स, केसरी हेडन वाल्श जूनियर.