ICC World Cup 2019, India vs South Africa: कॉमेंट्रेटर चुकला, भारत नाणेफेक जिंकला, दक्षिण आफ्रिका क्षणभर अवाकच झाला!
India vs South Africa ICC World Cup 2019 | Photo credit: archived, edited, representative image

India vs South Africa, ICC World Cup 2019: आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांतील पहिलाच सामना हॅम्पशेअर (Hampshire) येथील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंड (Rose Bowl Cricket Ground) येथे पार पडत आहे. दरम्यान, नाणेफेक करण्यासाठी टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघ कर्णधार फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)  मैदानात उतरले. पंचांनी नाणेफेक केली. त्यानंतर जे घडले ते पाऊन भारतीय क्रिकेट संघ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. पण, काही क्षणातच सर्व काही शांत झाले.

त्याचे झाले असे, पंचांनी नाणेफेक केली. नाणे हवेत असताना विराट छापा बोलला. पण, काटा आला. दरम्यान, या सामन्याची कॉमेंट्री करण्यासाठी बसलेल्या इंग्लिश कॉमेंट्रेटर मार्क निकोलस यांनी चुकून 'इंडिया हैव वॉन द टॉस' म्हणजेच भारताने नाणेफेक जिंकली असे म्हटले. मार्क निकोलस यांचे शब्द कानी पडताच विराट कोहलीने त्यांना घडलेली चूक लगेच ध्यानात आणून दिली. त्यानंतर निकोलस यांनीही घडलेला प्रकार ध्यानात येता चूक सुधारली.आणि नाणेफेक नेमकी कोणी जिंकली ते संगितले.

दरम्यान, नाणेफेक जिंकलेल्य दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाणेफेक पराभूत झालेल्या भारतीय संघाताल गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. (हेही वाचा, Live Cricket Streaming of India vs South Africa ICC World Cup 2019: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ

भारत: विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.

साउथ अफ्रीका: फाफ डु प्लेसिस डु प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डि कॉक (विकेटकीपर), जे पी डुमिनी, डेविड मिलर, रासी वैन डेर डुसैन, कैगिसो रबाडा, तबरेज शम्सी, इमरान ताहिर, आंदिले फेहलुकवायो, क्रिस मॉरिस.