IND vs SA, ICC Cricket World Cup 2019: आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 (ICC Cricket World Cup 2019) मधील भारतीय संघाचा पहिलावहीला सामना आज बलाढ्य दक्षिण आफ्रिकेसोबत हॅम्पशेअर (Hampshire) येथील रोज बाऊल क्रिकेट ग्राऊंड (Rose Bowl Cricket Ground) येथे रंगणार आहे. वर्ल्डकपमधील दक्षिण आफ्रिका संघाचा हा तिसरा सामना असून पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभव पत्करावा लागल्याने या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलामीचा सामना असल्याने जिंकण्याच्या उद्देशानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पहिला सामना जिंकून वर्ल्डकपची चांगली सुरुवात करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. हा सामना जिंकण्यासाठी रोहित शर्मा, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांची महत्त्वाची भूमिका ठरु शकते. वर्ल्डकप मधील टीम इंडियाचा सलामीचा सामना तुम्ही ऑनलाइन HOTSTAR आणि STAR SPORTS वर पाहु शकता. (ICC Cricket World Cup 2019 साठी Reliance Jio ची धमाकेदार ऑफर; सर्व सामने Hotstar फ्री मध्ये पहाण्याची संधी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका नाणेफेक:
Toss news from the Hampshire Bowl!
Faf du Plessis wins the toss and South Africa will bat first.#SAvIND LIVE 🔽 https://t.co/yx6Mkqsy3J pic.twitter.com/RZXnBCsOsF
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 5, 2019
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडियाचा सलामीचा सामना, काय असणार विराट ब्रिगेडची रणनीती?)
असे असतील संघ:
दक्षिण आफ्रिका:
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), डेविड मिलर, एडिन मार्कराम, हाशिम अमला, रासी वॅन डेर डुसॅन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कागिसो रबाडा, लुंगी नगिडी, इमरान ताहिर, डेल स्टेन, तबरेज शम्सी, जे. पी. ड्यूमिनी, आंदिले फेहुलक्वायो, ड्वयान प्रीटोरियस, क्रिस मॉरिस.
भारत:
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, एमएस धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव,भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, केएल राहुल, विजय शंकर आणि मोहम्मद शमी.