30 मे पासून जगभरात क्रिकेट वर्ल्डकपचा फिव्हर आहे. वर्ल्डकपची हीच क्रेझ लक्षात घेत रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास प्लॅन लॉन्च केला आहे. क्रिकेट विश्वचषकाच्या सर्व सामन्यांचं प्रसारण जिओ ग्राहकांना पाहता यावे यासाठी जिओ कंपनीने हॉटस्टारशी भागीदारी केली आहे. त्यामुळे जिओच्या सर्व युजर्संना वर्ल्ड कपचे सर्व सामने हॉटस्टारवर फ्री मध्ये पाहता येणार आहेत.
या सेवेचा लाभ रिलायन्स जिओच्या तब्बल 23 कोटी ग्राहकांना मिळेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हॉटस्टार अॅप डाउनलोड करावं लागेल. यामुळे तुम्ही जिओ टीव्ही अॅपवर सामने पहाण्यासाठी लॉनईन केल्यास तुम्हाला हॉटस्टार अॅपवर रिडिरेक्ट केलं जाईल.
रिलायन्स जिओचे ट्विट:
World Cup 2019, Live & Free on @hotstartweets for all Jio users. #WithLoveFromJio #CWC19 #Cricket #CricketWorldCup #WorldCup pic.twitter.com/5YE9Y2iqqD
— Reliance Jio (@reliancejio) June 4, 2019
तसंच जिओने 'क्रिकेट प्ले अलाँग' (Cricket Play Along) हा गेमही सादर केला आहे. सामन्या दरम्यान युजर्सच्या मनोरंजनासाठी हा गेम सादर केला जाईल. यात गेममध्ये क्रिकेटसंबंधित काही प्रश्न विचारले जातील. याशिवाय जिओने 251 रुपयांचा नवा प्लॅन सादर केला आहे. यात 51 दिवसांसाठी एकूण 102 जीबी इंटरनेट डेटा मिळेल.