497 धावांची डाव घोषित केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला प्रारंभिक झटका देऊन दबाव आणला आहे. आफ्रिकेने डीन एल्गर आणि क्विंटन डॅकॉक यांच्या विकेट्स 9 धावांवर गमावल्या.
SA 9/2 in 5 Overs | India vs South Africa 3rd Test Day 2 Updates: खराब प्रकाशामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन (जेएससीए) स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका (South Africa) विरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या अखेरच्या सामन्यात खराब सुरुवात झाल्यानंतर भारतीय डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 3 बाद 224 धावा केल्या होत्या. यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाबाद 117 तर कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 83 धावांवर खेळत होते. पहिल्या दिवशी टी ब्रेकनंतर खराब प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. आतापर्यंत रहाणे आणि रोहित यांच्यात चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी झाली आहे. दुसऱ्या दिवशी दोन्ही फलंदाज मोठा स्कोर उभा करण्याचा प्रयत्न करतील. यादरम्यान, रहाणेदेखील शतक पूर्ण करण्याचे प्रयत्न करेल. रोहितने आतापर्यंत 164 चेंडूंचा सामना केला आहे, त्यामध्ये त्याने 14 चौकार आणि चार षटकार ठोकले आहेत, तर रहाणेने आतापर्यंत 135 चेंडूत 11 चौकार आणि एक षटकार ठोकला आहे.
रांची स्टेडियममध्ये तिसऱ्या टेस्टमध्ये भारताची चांगली सुरुवात झाली आणि 12 धावांवर पहिला धक्का बसला. स्लिपमध्ये डिन एल्गर याच्या हाती मयंक अग्रवाल आफ्रिकन गोलंदाज कगिसो रबाडा याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अग्रवाल 10 करू शकला. मयंक बाद झाल्यानंतर रबाडाने 16 धावांवर भारताला दुसरा धक्का दिला. चेतेश्वर पुजारा शून्यावर एलबीडब्ल्यू आऊट झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार विराट कोहली जास्त काळ क्रीजवर थांबू शकला नाही आणि 12 धावांवर एनरिच नॉर्टजे यानेत्याला पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला. यापूर्वी टीम इंडियाने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या आणि अंतिम मॅचमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. इशांत शर्मा याला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याची जागी डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम याला संधी देण्यात आली आहे.