आर अश्विनच्या गोलंदाजीवर विशाखापट्टणम कसोटीच्या तिसर्‍या दिवशी भारत सामन्यात पुनरागमन केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आठ गडी गमावत 385 धावा केल्या आणि त्यांचा 117 धावांनी पिछाडीवर पडला.  वर्नोन फिलैंडर याला बाद करत अश्विनने टेस्ट सामन्यात पाचवा गडी बाद केला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुध्द पाचव्यांदा आणि भारतामध्ये 21 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत.फिलैंडर शून्यावर बाद झाला. 

रवींद्र जडेजाने डीन एल्गरला बाद केले आणि त्याच्या कसोटी कारकीर्दीत 200 कसोटी बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा जडेजा, हा डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने 44 सामन्यात 200 बळी घेतले आहेत. अखेर भारताला ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती त्यांना मिळाली. एल्गारने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण खोल मध्य विकेटवर उभे असलेल्या चेतेश्वर पुजाराने पुढे जाऊन झेल टिपला.

रवींद्र जडेजाने डीन एल्गरला बाद केले आणि त्याच्या कसोटी कारकीर्दीत 200 कसोटी बळी पूर्ण केले. ही कामगिरी करणारा जडेजा, हा डावखुरा फिरकीपटू आहे. त्याने 44 सामन्यात 200 बळी घेतले आहेत. अखेर भारताला ज्या विकेटची प्रतीक्षा होती ती त्यांना मिळाली. एल्गारने स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला पण खोल मध्य विकेटवर उभे असलेल्या चेतेश्वर पुजाराने पुढे जाऊन झेल टिपला.

डी कॉक आणि डीन एल्गार यांनी शानदार फलदांजी केली. यामुळे संघाने 300 धावांचा टप्पा गाठला. आणि यासह फॉलोऑनदेखील टाळला. डी कॉकने 72 तर एल्गारने 150 धावा केल्या आहेत. एल्गारचा सर्वाधिक स्कोर 199 आहे. त्याने बांग्लादेशविरुद्ध या धावा केल्या होत्या. 

 विशाखापट्टणम कसोटीच्या तिसर्‍या दिवशी चहाच्या वेळी दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व बनवून ठेवले आहेत. चहाच्या वेळेपर्यंत आफ्रिकी संघाने 5 विकेट गमावत 292 धावा केल्या होत्या. डीन एल्गर 133 आणि क्विंटन डी कॉकने 69 धावांची खेळी केली.

डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक यांच्यात सहाव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी रचली गेली. यात डी कॉकचे 45 धावांचे योगदान आहे. ते वेगाने धावा करत आहेत. डी कॉकने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहेत. त्याने 79 चेंडूत 7 चौकार आणि एका षटकारासह 50 धावा केल्या. यंदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात 50 धावांचा टप्पा गाठणारा क्विंटन डी कॉक हा तिसरा फलंदाज आहे. त्याआधी डीन एल्गार आणि फाफ डु प्लेसी यांनीही 50 हून अधिक डाव केल्या आहेत. 

दक्षिण आफ्रिकेच्या 200 धावा पूर्ण झाल्या. डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक नाबाद अनुक्रमे 107 आणि 12 धावांवर खेळत आहेत. दक्षिण आफ्रिका अजून भारताच्या 282 धावा मागे आहे. शिवाय, त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 

दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डीन एल्गार याने भारतीय संघाविरुद्ध पहिले टेस्ट शतक केले आहेत. एल्गारने चेंडूत शतक पूर्ण केले. दरम्यान, एल्गारच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 12 वे टेस्ट शतक आहे. एल्गारने कर्णधार फाफ डु प्लेसिस सह शतकी भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. डु प्लेसिसने अर्धशतक केले आणि लंचनंतर काही वेळाने रविचंद्रन अश्विन याच्या गोलंदाजीवर 55 धावांवर झेल बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने 91 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. डु प्लेसिसच्या टेस्ट कारकिर्दीतील हे 20 वे अर्धशतक आहे. यापूर्वी डीन एल्गार याने अर्धशतक पूर्ण केले होते. भारतीय गोलंदाजांनी 4 विकेट्स घेऊन आफ्रिकी संघाला मुश्किलीत पडले. पण, नंतर डु प्लेसिस आणि एल्गार यांनी संघाचा डाव सावरला. सध्या टीम इंडियाकडे 344 धावांची आघाडी आहे. 

टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होताच दक्षिण आफ्रिकेने आपली चौथी विकेट गमावली. टेम्बा बावूमा 18 धावा करून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस याने डीन एल्गार याच्या साथीने संघाचा डाव सावरला. लंचपर्यंत एल्गार 76 तर डु प्लेसिस धावांवर 48 खेळत आहे.

Load More

भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पहिला कसोटी सामना विशाखापट्टनमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पहिल्या मॅचमध्ये भारतीय कर्णधार विराट कोहली याने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाच्या सलामीवीरांनी चांगला खेळ दाखवून संघाला पहिल्या डावांत मोठी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने आपला पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. (IND vs SA 1st Test Day 2: दुसऱ्या दिवशी टीम इंडियाला Advantage, दक्षिण आफ्रिकाने 39 धावांवर गमावले 3 विकेट्स)

भारताच्या मोठ्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाची सुरुवात गडबडली. दुसऱ्या दिवसाखेर आफ्रिकेने 3 विकेट्स गमावत 39 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची फिरकी जोडी-रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अश्विनने दोन तर जडेजाने एक विकेट घेतली. आफ्रिकेने दुसऱ्या दिवशी डीन एल्गार, एडन मार्करम, आणि थेउनिस डी ब्रुयन यांची विकेट गमावली. एल्गारने 27 धावा केल्या तरमार्करम आणिडी ब्रुयन मोठा स्कोर करू शकले नाही. भारतासाठी सलामीची जोडी मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी चांगला खेळ केला. मयंकने टेस्टमधील पहिले दुहेरी शतक केले तर रोहितला दुहेरी शतक करण्यात अपयशी राहिला आणि 176 धावा करून झेल बाद झाला. मयंक आणि रोहितला शोधून अन्य कोणताही फलंदाज प्रभाव पाडण्यात यशस्वी राहिला नाही.

दक्षिण आफ्रिकाई गोलंदाजांना सुरुवातीला कोणतेही यश मिळाले नाही. पण, दूरस्थ दिवशी रोहित बाद होताच विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच राहिला. आफ्रिकासाठी केशव महाराज याने 3 विकेट्स घेतल्या.