इंग्लंड (England) मधील आयसीसी (ICC) विश्वचषक आता आपल्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे. मॅन्चेस्टर (Manchester) येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) क्रिकेट मैदानावर भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) संघात पहिला सेमीफायनल सामना खेळाला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंडने पहिले फलंदाजी करत टीम इंडिया समोर जिंकण्यासाठी 240 धावांचे लक्ष ठेवले आहेत. न्यूझीलंडसाठी विल्यमसन (Kane Williamson) ने 95 चेंडूत 67 धावा केल्या तर रॉस टेलर (Ross Taylor) याने 89 चेंडूत 73 धावा केल्या. टेलरने षटकारासह 73 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, चहलची दहावी ओव्हर महागडी ठरली. चहलने आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या. भारतासाठी अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आपल्या 10 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 34 धावा दिल्या. तर चहल (Chahal) याने 10 ओव्हरमध्ये 1 विकेट घेत 64 धावा दिल्या. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ने मोक्याच्या क्षणी जेम्स निशाम (James Neesham) ला 12 धावांवर बाद केले. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचमध्ये मजा करताना दिसला विराट कोहली; मैदानावर केला डान्स, 'ओ रवि रवी जडेजा' चा लावला नारा Watch Video)

बुमराह व भुवनेश्वर कुमार यांच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडला पहिल्या दहा षटकांत 1 बाद 27 धावा करता आल्या. भारत-न्यूझीलंड सेमीफायनलमधील सामना मंगळवारी पावसामुळे थांबवण्यात आला होता. त्यामुळे उर्वरित सामना आज राखीव दिवशी सुरु झाला. भारतासाठी भुवनेश्वरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. बुमराह, हार्दिक, जडेजा आणि चहल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या.

दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या टीम इंडियाने साखळी फेरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत नऊपैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. भारत आणि न्यूझीलंडमधील हा यंदाच्या विश्वचषकमधील पहिला सामना आहे. यांच्यातील साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यात विजय मिळवत एक संघ लॉर्ड्स (Lords) च्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या फायनलमध्ये धडक मारेल.

आजच्या सामन्यात भारताकडून दोन मोठे बदल करण्यात आले होते. भारताकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) ला संघात जागा मिळाली नाही. तर, कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला संघात घेण्यात आले.