(Photo Credits: Getty)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आज भारतीय संघ न्यूझीलंडशी सेमीफायनलमध्ये भिडणार आहे. न्यूझीलंड (New Zealand) चा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने मैदानावर असं काही केलं की चाहते देखील आनंदी झाले. अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने हेन्री निकोलस (Henry Nicholls) याला 28 धावांवर बाद करत कोहली नाचू लागला आणि 'ओ रवि रवी जडेजा' चा नारा लावत विकेटचा आनंद साजरा केला. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. (IND vs NZ, World Cup 2019 Semi-Final मॅचआधी जसप्रीत बुमराहचे अनुकरण करत विराट कोहली ने केली नेट्समध्ये बॉलिंग, पहा Video)

दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर (Ross Taylor) यांनी आपल्या सावध खेळीने संघाचा डाव सावरला. विल्यमसनने 79 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. 34 ओव्हरनंतर न्यूझीलंडचा स्कोर 2बाद 128 धावा असा आहे.

दरम्यान भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) यांचा यंदाच्या विश्वचषकमधील हा पहिला सामना आहे. साखळी फेरीतील सामना पावासामुळे रद्द झाला होता. आजच्या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. टीमसाठी सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संघात जागा देण्यात आले नाही. तर, कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) ला संघात घेण्यात आले आहे.