India vs New Zealand 5th ODI 2019: तब्बल 52 वर्षांनी भारतीय संघाचा न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदाच दणदणीत विजय
भारतीय संघ विजयी (फोटो सौजन्य- ट्वीटर)

India vs New Zealand 5th ODI 2019: भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध वेलिंग्टन येथे खेळवण्यात आलेला आजच्या पाचव्या एकदिवशीय सामन्यात न्यूझीलंडच्या संघाला त्यांच्याच मायदेशी हरवत दणदणीत विजय मिळवला आहे. तर पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने इतिहास रचला असून 4-1 अशा फरकाने तब्बल 52 वर्षांनी न्यूझीलंड येथे हरविले आहे.

भारतीय संघाने प्रथम फलंजादी स्विकारली होती.तर भारतीय संघाने 49.5 ओव्हरमध्ये 252 धावांचे आव्हान दिले. तर न्यूझीलंडच्या संघाने 44.1 ओव्हरमध्ये 217 धावा काढल्या. त्यामुळे 35 धावांच्या फरकाने न्यूझीलंड संघाचा दारुण पराभव झाला आहे. (हेही वाचा-India vs New Zealand 5th ODI 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनी खेळणार, विरोधी संघाला हरविण्यासाठी भारतीय संघ सज्ज)

तर महेंद्र सिंग धोनीला फलंदाजीमध्ये जास्त धावा काढता आल्या नाहीत. तर हार्दिक पांड्या आणि विजय शंकर या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघाला 252 धावा काढण्यात यश आले. तर भारतीय संघाने पहिल्यांदा 1967 रोजी न्यूझीलंड येथे दौरा केला होता. त्यावेळी टेस्ट सीरिजमध्ये 3-1 (4) अशा गुणांनी विजय मिळवला होता.