India vs New Zealand 5th ODI 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या एकदिवसीय सामन्यात धोनी खेळणार, विरोधी संघाला हरविण्यासाठी भारतीय संघ सज्ज
Mahendra Singh Dhoni. (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

India vs New Zealand 5th ODI 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड शेवटचा एकदिवसीय पाचवा सामना वेलिंग्टन येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, भारतीय संघ 3-1 अशा फरकाने विरोधी संघाला हरवत पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या अनुपस्थित भारतीय संघाला चौथ्या एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव स्विकारावा लागला होता. तर न्यूझीलंडच्या संघाने भारतीय संघावर 8 विकेट्सनी मात करत विजय मिळवला होता. येत्या रविवारी (3 फेब्रुवारी) होणाऱ्या सामन्यात विरोधी संघ हा आत्मसन्मानाच्या भावनेने खेळण्यास उतरेल अशी आशा आहे. तर भारतीय संघ हा पराभव झालेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी न्यूझीलंडच्या संघाला टक्कर देणार आहे.

भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) ह्याला काही कारणामुळे दुखापत झाल्याने दोन सामने खेळू शकला नाही. मात्र धोनीच्या पदापर्णाने पुन्हा भारतीय संघाचे मनोबल उद्याच्या सामन्यासाठी वाढणार असल्याची शक्यता आहे. परंतु सामना खेळवला जाणार असलेल्या ठिकाणचे वातावरण प्रतिकुल असणार आहे. तरीही विराटच्या गैरहजेरीत धोनी खेळणार असल्याने संघाला मोठा आधार मिळणार आहे. संघाचे सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी धोनी उद्याचा सामना खेळणार असल्याचे सांगितले आहे. तर धोनी पूर्णपणे ठिक असून पाचवा एकदिवसीय सामना खेळू शकणार आहे.(हेही वाचा-India vs New Zealand 4th ODI: न्युझीलंड विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवावर काय म्हणाला रोहित शर्मा)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन दिवसांच्या एकदिवसीय सामन्यात धोनीला 'मॅन ऑफ द सीरीज' (Man Of The Series) या पुरस्काराने गौरवण्यात आले. तर आगामी वर्ल्ड कपचे लक्ष समोर ठेवून तरुण खेळाडू शुभन गिल ह्याला प्लेईंग इलेव्हन मध्ये जागा मिळणार असल्याची शक्यता आहे. हेमिल्टन येथे अंबाती रायडू, केदार जाधव आणि दिनेश कार्तिक खेळण्यास असमर्थ राहिले. तर रोहित शर्मा आणि शिखर धवन लवकर आऊट झाल्याने कोहलीच्या अनुपस्थितीत यांच्यावर पूर्ण भरोसा करणे अशक्य असल्याचे म्हटले जात आहे.