Yuzvendra Chahal & Kuldeep Yadav (Photo Credit: BCCI/Twitter)

India Vs New Zealand 3rd ODI: भारत विरुद्ध न्युझीलंड एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) या जोडीने नवा विक्रम केला आहे. या दोघांनी आतापर्यंत झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यात 13 विकेट्स घेतल्या होत्या. या विकेटसह दोघांचेही बळींचे शतक पूर्ण झाले आहे. या दोघांनी 26 एकदिवसीय सामन्यात 100 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

नाणेफेक जिंकत आज न्युझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अडखळत सुरुवात झालेल्या न्युझीलंडचा डाव रॉस टेलरच्या दमदार खेळीमुळे सावरला. मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्ना या सलामीवीरांना 26 धावात भारताने तंबूत परतवले. तर कर्णधार केन विलियम्सनची विकेट घेण्यात चहलला यश आले. World Cup 2019 च्या संघात 'या' दोन खेळाडूंना एकत्र संधी दिल्यास विजय भारताच्या पथ्यावर!

केनची विकेट कुलदीप, चहल जोडीसाठी विशेष ठरली. याच्या विकेटसह दोघांनी 100 विकेट्स घेण्याचा विक्रम रचला. कुलदीपच्या नावावर 37 एकदिवसीय सामन्यात 77 विकेट्स तर चहलने 37 एकदिवसीय सामन्यांत 66 विकेट्स घेतल्या आहेत.