IND vs NZ 1st Test Day 5: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला जात आहे. या सामन्यात पाचव्या दिवशी टीम इंडियाला पराभवाचा धोका आहे. तर दुसरीकडे पावसाची छायाही सामन्यावर दिसत आहे. सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत गारद झाला. त्यानंतर न्यूझीलंडने शानदार फलंदाजी करत पहिल्या डावात टीम इंडियावर 356 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात टीम इंडियाने अप्रतिम पुनरागमन करत 356 धावांची आघाडी तर संपवलीच, पण चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत किवी संघावर 106 धावांची आघाडीही मिळवली. चौथ्या दिवशीही पावसामुळे सामना बराच वेळ थांबला होता.
बंगळुरूमध्ये आज हवामान कसे असेल?
सामना सुरू होण्यापूर्वीच पाचही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाला, तर चौथ्या दिवशीही पाऊस झाला. आता आज पाचव्या दिवशी पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, आज बंगळुरूमध्ये पावसाची 80 टक्के शक्यता आहे. Accuweather च्या रिपोर्टनुसार, पहिल्या सत्रापासूनच पाऊस पाहायला मिळतो. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st Test Day 5 Live Streaming: थोड्याच वेळात पाचव्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात, न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज; तर भारताला करावा लागणार चमत्कार)
टीम इंडियाकडे केवळ 106 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात टीम इंडियाचा डाव 462 धावांवर आटोपला. त्यानंतर भारताकडे केवळ 106 धावांची आघाडी आहे. आता हा सामना जिंकण्यासाठी एकीकडे न्यूझीलंडला 107 धावा करायच्या आहेत, तर दुसरीकडे टीम इंडियाला किवी संघाला 107 धावांआधीच ऑलआऊट करावं लागणार आहे. दोन्ही संघांचा आज पूर्ण दिवस आहे. मात्र, आता न्यूझीलंडचा वरचष्मा दिसत आहे.