Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

IND vs NZ 1st Test Day 5 Live Streaming: थोड्याच वेळात पाचव्या दिवसाच्या खेळाला होणार सुरुवात, न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज; तर भारताला करावा लागणार चमत्कार

चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पण फक्त 4 चेंडू खेळू शकला. आता भारताला जिंकण्यासाठी 10 विकेट लवकर काढाव्या लागतील. पण हा सामना सध्या न्यूझीलंडच्या बाजूने आहे.

क्रिकेट Nitin Kurhe | Oct 20, 2024 08:22 AM IST
A+
A-
IND vs NZ (Photo Credit: X & Jio Cinema)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडचा संघ फलंदाजीसाठी उतरला. पण फक्त 4 चेंडू खेळू शकला. आता भारताला जिंकण्यासाठी 10 विकेट लवकर काढाव्या लागतील. पण हा सामना सध्या न्यूझीलंडच्या बाजूने आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक क्षणाची माहिती पाहता येईल. (हे देखील वाचा: India vs New Zealand 1st Test Day 4 Stumps Scorecard: टीम इंडियाचा दुसरा डाव 462 धावांवर आटोपला, सरफराज खान आणि ऋषभ पंतची स्फोटक खेळी, न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांची गरज; पहा स्कोअरकार्ड)

दोन्ही संघाची प्लेइंग 11

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टी.आय.


Show Full Article Share Now