India vs England Test Series: भारतीय संघाची घोषणा; कोहली, इशांत आणि हार्दिक पांड्या खेळणार तर पृथ्वी शॉ संघातून बाहेर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड संघाच्या दरम्यान चार टेस्ट मॅचची सीरिज येत्या 5 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. तत्पूर्वीदोन टेस्ट मॅचसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कॅप्टन विराट कोहली याला संघात स्थान दिले गेले असून त्याच्या सोबत इशांत शर्मा आणि हार्दिक पांड्या याला सुद्धा सहभागी करण्यात आले आहे. डाव्या हाताचा स्पिनर अक्षर पटेल याला पहिल्यांदाच संघात सहभागी करण्यात आले आहे. 18 खेळाडूंच्या संघात नटराजन आणि नवदीप सैनी यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही.(IND vs AUS Test 2020-21: नवख्या टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव, Netizens मानत आहे राहुल द्रविडचे आभार, पहा Tweets)

कोहली ऑस्ट्रेलियाच्या विरोधातील अखेरच्या तीन सामन्यात खेळू शकला नाही. त्यावेळी कोहली आपली पत्नी अनुष्का हिला झालेल्या गोंडस मुलीसोबतच होता. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये खेळून इशांतने फिटसेन बद्दल दाखवून दिले आहे. तो गेल्या फेब्रुवारीनंतर टेस्ट मॅच मध्ये खेळू शकला नाही आहे. आयपीएल 2020 दरम्यान पोटाच्या समस्येमुळे तो भारतात परतला होता. 100 वी टेस्च मॅच पर्यंत पोहण्यासाठी आणखी त्याला 3 सामने खेळायचे होते.

जसप्रीत बुमराह, मोम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर ने ऑस्ट्रेलियात शानदार खेळी केली आहे. तिघांनी आपले स्थान कायम ठेवण्यासाठी यश मिळवले आहे. सिराजने तीन टेस्ट मॅचमध्ये 13 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शार्दुलने अखेरच्या टेस्ट मध्ये सात विकेट्स घेण्यासह अर्धशतक ही पूर्ण केले आहे. तर अश्विन याला पाठीचा त्रास असला तरीही संघात ठेवले आहे. त्याच्या सोबत कुलदीप यादव याला सुद्धा ठेवले गेले आहे. सुंदर ने ब्रिस्बेन टेस्ट मध्ये चार विकेट्स घेण्याव्यतिरिक्त उत्तम फलंदाजी सुद्धा केली आहे. या तिघांसह अक्षर पटेल याची सुद्धा निवड करण्यात आली.(IND vs AUS 4th Test 2021: शुभमन गिलची जबरा बॅटिंग, रिषभ पंतच्या अर्धशतकने टीम इंडियाचा 2-1ने रोमहर्षक विजय, Gabba येथे ऑस्ट्रेलियाचा 32 वर्षात पहिला पराभव)

गोलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास शुभमन गिल आणि रोहित शर्मा हे ओपनिंगला दिसून येतील अशी अपेक्षा आहे. मयंक अग्रवाल तिसरा ओपनर असेल. पृथ्वी शॉ याला संघात स्थान देण्यात आलेले नाही. शॉ एडिलेड टेस्ट मध्ये खेळला होता. परंतु त्याने उत्तम कामगिरी केली नाही. केएल राहुल ऑस्ट्रेलियात खेळला नाही. पण तरीही त्याला संघात ठेवण्यात आले होते. पण दुखापतीमुळे तो परतला होता. त्यानंतर बंगळुरु मध्ये नॅशनल क्रिकेट अॅकेडमी मध्ये ट्रेनिंग घेत आहे.