भारत आणि बांग्लादेश (India Vs Bangladesh) यांच्यात पहिला टि-२० सामना (1st T-20 Match) दिल्ली (Delhi) येथील अरुण जेटली मैदानात (Arun Jaitley Stadium) खेळला जाणार आहे. मात्र, दिल्ली येथील खराब हवामानामुळे (Air Pollution) हा सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसापूर्वी भारतासह बांग्लादेशचे खेळाडू प्रदुषक रोधक मुखवटा लावून मैदानात सराव करताना दिसले होते. परंतु, आज दिल्ली शहरात अधिकच धुरकट वातावरण तयार झाले असून खेळाडूसह इतर लोकांनाही खराब हवामानाचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर, दिल्ली शहरातील काही नागरिकांनी शहर सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समोर आली आहे.
बांगलादेशचा क्रिकेट संघ भारतासोबत सामना खेळण्यासाठी भारतात आले आहे. आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला सामना संध्या ७ वाजता खेळला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे, दिल्ली येथे खराब हवामानाचे प्रभाव वाढला असून खेळाडूंना सामना दरम्यान अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे हा सामना रद्द केला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताचा माजी फंलदाज आणि भाजपचे नेते गौतम गंभीर यांनीही दिल्लीच्या प्रदुषणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे देखील वाचा- Match Fixing वर शोएब अख्तर याचा खळबळजनक खुलासा, पूर्ण पाकिस्तानी क्रिकेट टीमला म्हटले मॅच फिक्सर
ट्विट-
Hours before #IndvsBan, efforts are being made to control pollution around Arun Jaitley Stadium in Delhi #DelhiAirEmergency pic.twitter.com/Su3LbxMhGV
— Saurabh Trivedi (@saurabh3vedi) November 3, 2019
संघ-
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मनीष पांडे, कृणाल पांड्या, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, यजुवेंद्र चहल, दीपक चहर, राहुल चहर, शिवम दुबे
बांगलादेश संघ- महमदुल्ला रियाद (कर्णधार), मुशफिकर रहिम, मुस्ताफिझूर रेहमान, तैजून इस्लाम, मोहम्मद मिथुन, लिटन दास, सौम्य सरकार, नैम शेख, अफिफ हुसेन सैकत, शफिऊल इस्लाम, अमिनूल इस्लाम बिपलॉब, अराफत सन्नी, अबू हैदर, अल- अमिन हुसैन