IND vs BAN (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सध्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्याचबरोबर हा सामना बांगलादेशसाठीही खूप महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक आहे. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

कानपूरच्या मैदानावर भारताची कशी आहे कामगिरी?

भारत 1952 पासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर कसोटी क्रिकेट खेळत आहे. टीम इंडियाने आतापर्यंत येथे एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये भारताने 7 सामन्यात विजय मिळवला असून 3 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत. टीम इंडियाने 2010 पासून येथे फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे दोन्ही सामने न्यूझीलंडविरुद्ध खेळले आहेत. 2016 मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती. तर, 2021 मध्ये भारताचा सामना अनिर्णित राहिला.

हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Kanpur Weather Report: कानपूर कसोटीत पाऊस बिघडवणार टीम इंडियाचा खेळ? तर बांगलादेश करणार मालिकेत बरोबरी? येथे वाचा हवामान रिपोर्ट

आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण करण्यापासून फक्त दोन शतके दूर आहे.

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण करण्यासाठी 129 धावांची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला 27 हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ 35 धावांची गरज आहे.

टीम इंडियाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला कसोटी क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा युवा गोलंदाज कुलदीप यादवला 300 बळी पूर्ण करण्यासाठी आणखी सहा विकेट्सची गरज आहे.

बांगलादेशचा यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकुर रहीम कसोटी क्रिकेटमध्ये 6,000 धावांचा टप्पा गाठण्यापासून 87 धावा दूर आहे.

टीम इंडियाचा महान अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला 3000 धावा आणि 300 बळींच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी आणखी एका विकेटची गरज आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गाठण्यासाठी सात षटकारांची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला 100 कसोटी षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्यासाठी सोळा षटकारांची गरज आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचा महान गोलंदाज तैजुल इस्लाम 200 कसोटी बळींपासून पाच विकेट्स दूर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा महान गोलंदाज मेहदी हसन मिराझला 300 बळी पूर्ण करण्यासाठी आणखी चार विकेट्सची गरज आहे.