Kanpur Weather Update (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्या आजपासूनर सुरुवात होणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur, Green Park) सकाळी 10.00 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता बांगलादेशचा क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN 2nd Test Live Streaming: टीम इंडिया बांगलादेशचा ‘सफाया’ करण्यास सज्ज, दुसऱ्या कसोटी सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, 'इथं' पाहा थेट प्रक्षेपण)

कानपूर कसोटी सामन्यावर पावसाचे काळे ढग (IND vs BAN 2nd Test Weather Update)

कानपूर कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान खेळवला जाईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये 92 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ कानपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर पावसाचा परिणाम होऊ शकतो. त्यानंतर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहील. याशिवाय कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 80 टक्क्यांपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 59 टक्के पाऊस पडू शकतो.

ग्रीन पार्क स्टेडियमचा इतिहास (History of Green Park Stadium)

कानपूरचे ग्रीन पार्क स्टेडियम हे भारतातील सर्वात जुन्या स्टेडियमपैकी एक आहे. या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 1952 साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. ग्रीन पार्कमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 23 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 7 सामने जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. या मैदानावर 13 सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर बांगलादेश प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 

भारत

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेश 

शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.