India vs Australia 4th Test: अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला; ऑस्ट्रेलिया 6 बाद 236 अशा स्थितीत, भारताला कसोटी जिंकणं झालं कठीण
India vs Australia 4th Test (Photo Credits: Twitter)

India vs Australia 4th Test: सिडनीमध्ये सुरु असलेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना अपुऱ्या प्रकाशामुळे थांबण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन संघ सध्या 6 बाद 236 अशा स्थितीमध्ये आहे. अंपायरने काळोख होत असल्याचं पाहत सामना मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजी करत आहे. पीटर हैंड्सकॉम्ब (Handscomb)  91 बॉलमध्ये 28 रन आणि पैट कमिंस (Cummins) 41 बॉल मध्ये 25 या धावसंख्येवर आहेत. आस्ट्रेलिया अजूनही 386 धावांच्या पिछाडीवर आहे. भारताने पहिला डाव 622 धावांवर घोषित केला आहे. KL Rahul च्या सिडनी मैदानावरील Sportsman Spirit चं अंपायर सह प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक

दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची एकही विकेट गेली नव्हती. दुसऱ्या दिवस अखेर 24 धावा करत दिवस संपला होता. आज दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने ऑस्ट्रेलियाला दिवसाची सुरुवात करून दिली मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या पटापट विकेट गेल्या. आज अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवल्याने आता भारतालाही हा सामना जिंकणं कठीण झालं आहे.