भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Photo Credit :twitter

India Vs Australia 2nd T20I : ऑस्ट्रेलियासोबत बुधवारी झालेल्या सलामीच्या क्रिकेटच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा 4 धावांनी पराभव झाला. तसेच भारतीय संघाकडून अटीतटीचे प्रयत्न करुन ही 7 बाद 169 धावा भारतीय संघ करु शकला होता. मात्र आजच्या दुसऱ्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघावर मात करण्यासाठी भारतीय संघाला अस्तित्वाजी झुंज  करावी लागणार आहे.

सलामीला मिळालेल्या पराभवामुळे भारतीय संघामध्ये नाराजगी पाहायला मिळाली. मात्र आज पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाचा क्रिकेटचा सामना खेळावला जाणार आहे. तसेच तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ हा 1-0 ने पुढे आहे. मात्र लोकेश राहुलच्या खराब फॉर्ममुळे तो संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर इंग्लंडविरुद्धच्या मँचेस्टरमधील T20I सामन्यात शतक ठोकणाऱ्या लोकेशला सलग सहा सामन्यांमध्ये 30 धावांच्या पुढे जाता आले नाही. परंतु कृणाल पांड्याने 4 षटकांत 55 धावा दिल्या.

ऑस्ट्रेलियामधील मैदाने ही मोठी असतात. त्यामुळे चौकार-षटकार मारण्याचे आव्हान संघापुढे नेहमीच असते. मात्र पहिल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी झाल्याने त्यांचे मनोबल अधिक उंचावलेले असणार आहे. तर या दुसऱ्या मालिकेसाठी विराट कोहली गोलंदाजी आणि फलंदाजी संयोजनात बदल करु शकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु पावसाचे सावट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.