Photo Credit-X

India Tour of Australia 2025-26: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक आता जाहीर झाले आहे. जिथे एकदिवसीय मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल. याशिवाय, पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील आठ वेगवेगळ्या ठिकाणी आठ सामने खेळले जाणार आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2025-26 वेळापत्रक

पर्थमध्ये पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर

अ‍ॅडलेडमध्ये दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर

सिडनीमध्ये तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर

टी 20 मालिकेतील सामने

कॅनबेरामध्ये पहिला टी20 सामना - 29 ऑक्टोबर

मेलबर्नमध्ये दुसरा टी20 सामना - 31 ऑक्टोबर

होबार्टमध्ये तिसरा टी20 सामना - 2 नोव्हेंबर

गोल्ड कोस्टमध्ये चौथा टी20 सामना - 6 नोव्हेंबर

ब्रिस्बेनमध्ये पाचवा टी20 सामना - 8 नोव्हेंबर