IND vs AUS (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Australia Men's Cricket Team: भारत-ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy 2024-25) शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळवला जात आहे. जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत कार्यवाहक कर्णधार म्हणून टीम इंडियाची जबाबदारी घेत आहे, कारण नियमित कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे भारतात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाची धुरा पॅट कमिन्सच्या हाती आहे. आज खेळाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात केवळ 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 7 गडी गमावून 67 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत ॲलेक्स कॅरी (19) आणि मिचेल स्टार्क (6) धावांवर नाबाद आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

भारतातील चाहत्यांना सकाळी 7.50 वाजता टीव्ही किंवा ऑनलाइनवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रेक्षपण पाहता येईल. या मालिकेचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर होणार आहे. त्याच वेळी, डीडी स्पोर्ट्सवर लाइव्ह ॲक्शनचा मोफत आनंद घेता येईल. त्याच वेळी, त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर पाहता येईल. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah Milestone: पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहची कमाल, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू)

दोन्ही संघाची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज