Mitchell Starc (photo Credit - X)

Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव 180 धावावर आटोपला आहे. स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच भारताविरुद्ध आपला पंजा उघडला. टीम इंडियाकडून नितीश रेड्डी यांनी सर्वाधिक 42 धावांची खेळी खेळली.

येथे वाचा स्कोरकार्ड

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीला येताच भारताची सुरुवात काही खास झाली नाही. मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला एलबीडब्ल्यू आऊट करून भारताला बॅकफूटवर आणले. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र स्टार्कच्या कहरात गोलंदाजीसमोर हे दोघेही टिकू शकले नाहीत. भारताने 16 चेंडूत राहुल, कोहली आणि गिलच्या विकेट्स गमावल्या. पंत आणि कर्णधार रोहित शर्माही काही कमाल दाखवू शकले नाहीत. नितीश रेड्डीने शेवटी थोडा वेगवान धावा करत भारताला 180 धावांपर्यंत नेले.

मिचेल स्टार्कने घेतल्या सहा विकेट

दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. मिचेल स्टार्कशिवाय स्कॉट बोलँड आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करू इच्छित आहे.