Test Team Rankings: ‘विराटसेने’चा सलग पाचव्या वर्षी ICC टेस्ट क्रमवारीत दबदबा पण ‘या’ विश्वविजयी टीमने 7 वर्ष गाजवलं आहे अधिराज्य
टीम इंडिया (Photo Credit: Getty Images)

ICC Test Team Rankings: आयसीसी (ICC) जेतेपदाच्या बाबतीत एमएस धोनी (MS Dhoni) हा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार असेल परंतु कर्णधार म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli) पदोन्नती झाल्यापासून भारतीय क्रिकेट संघाने कधीही न पाहिलेले वर्चस्व निर्माण केले आहे. गुरुवारी, आयसीसीने वार्षिक कसोटी संघाची रँकिंगची (ICC Annual Test Team Ranking) घोषणा करताच, भारतीय संघाने (Indian Team) सलग 5व्या वर्षी आघाडीवर आपला जलवा कायम ठेवला आहे. 2014 मध्ये विराटने कसोटी संघाची धुरा आपल्या हाती घेतली. 2010 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने प्रथम आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप गदा जिंकली आणि पुढच्या वर्षीही खेळाची पुनरावृत्ती केली पण कोहलीच्या नेतृत्वात आपले वर्चस्व गाजवता आले नाही. 2012 मध्ये इंग्लंडने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पदभार स्वीकारला आणि सलग तीन हंगामांमध्ये (2013, 2014, 2015) जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची संघात स्थान पटकावले. (ICC Test Team Rankings: कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम, ऑस्ट्रेलियाची घसरण)

ऑस्ट्रेलियाने (Australia) 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हातातून कसोटी गदा घेतली पण कोहलीचा भारतीय संघ क्रिकेट विश्वात वादळी खेळीसाठी तयार होता. त्यानंतर सलग पाचव्या वर्षी ‘विराटसेने’ने कसोटी क्रमवारीत अधिराज्य गाजवले आहे. मात्र ते अद्याप ऑस्ट्रेलियन संघाच्या 8 वर्षाच्या रेकॉर्डपासून दूरच आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सलग 8 वर्षे कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर राहणार आजवरचा एकमेव संघ आहे. 2002 पासून आयसीसीने कसोटी गदा प्रदान करण्यास सुरुवात केली. उद्घाटन प्रसंगी ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले आणि पुढील 7 वर्षे (2009 पर्यंत) आयसीसी गदा उंचावली. त्या काळात ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ यांनी थोडक्यात नेतृत्व केले होते, तर रिकी पॉन्टिंगने 8 वर्षाच्या मुख्य भागात कसोटी क्रिकेटयामध्ये कांगारू संघाचे नेतृत्व केले. पॉन्टिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने कसोटीतच नव्हे तर एकदिवसीय सामन्यातही खरोखरच सर्वोत्तम क्रिकेट खेळले. याच काळात ऑस्ट्रेलियन संघाने पॉन्टिंगच्या नेतृत्वात 2003 आणि 2007 वर्ल्ड कपवर देखील आपले नाव कोरले होते.

आयसीसीची आणखी एक कसोटी गदा, ज्याची बक्षीस रक्कम 1 लाख अमेरिकी डोलार्ड आहे, विराट कोहली आता जून महिन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात आपली आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.