भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजांचं गारुड
(Photo Credits: PTI | Twitter @ACCMedia1)

भारत - पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आशिया कप २०१८ मध्ये आमने सामने आले आहेत. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आजच्या सामन्यावर सट्टेबाजारात  मोठा सट्टा लावण्यात आला आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या कर्णधार विराट कोहली खेळात नसला तरी भारताचे जिंकण्याचे प्रमाण ८०% इतके आहे. सोबत नाणेफेक, शतक, अर्धशतक, चौकार, षटकार आणि विकेटअशा सर्वाच गोष्टींवर सट्टा लावण्यात आला आहे. आजच्या सामन्यात जर भारत जिंकला तर, सट्टा लावणाऱ्याला १.७० रुपये मिळतील तर पाकिस्तान जिंकला तर २.४० रुपये मिळतील.

भारतीय संघ जर नाणेफेक जिंकला तर १.८२ रुपये मिळतील आणि जर पाकिस्तान जिंकला तर २.८२ मिळतील. फलंदाजांमध्ये भारताच्या शिखर धवन आणि पाकिस्तानच्या शोएब मलिकवर जास्त सट्टा लावण्यात आला आहे. तसेच गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर वर सर्वाधिक बोली लावण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान हे सुद्धा सामना बघायला येणार अशी चर्चा आहे.