India Likely Playing XI Cape Town Test: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना 11 जानेवारीपासून केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी विशेषतः टीम इंडियासाठी (Team India) महत्वपूर्ण असेल कारण दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याची त्यांच्याकडे ही सुवर्ण संधी आहे. अशा परिस्थितीत या सामन्यात काही बदलांसह भारतीय संघ मैदानात उतरू शकतो. पाठीच्या दुखापतीमुळे जोहान्सबर्ग (Johannesburg) कसोटी सामन्यातून बाहेर बसलेला नियमित कर्णधार विराट कोहली भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक करू शकतो. आणि कोहलीने तिसऱ्या कसोटीत पुनरागमन केल्यास हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागणार आहे. (IND vs SA 3rd Test 2022: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार Dean Elgar ने दिले चॅलेंज, केप टाउन कसोटीत ‘या’ रणनीतीने टीम इंडियावर करणार हल्लाबोल)
विहारीने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 20 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्याने 84 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. पण विहारीला प्लेइंग XI मध्ये संधी मिळण्यासाठी हे पुरेसे नाही. विहारीशिवाय यष्टिरक्षक रिषभ पंत आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्याबाबतही संभ्रम कायम आहे. पंत त्याच्या खराब फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे तर सिराजला दुखापत झाली आहे. दुसऱ्या कसोटीत पंतच्या फलंदाजीमुळे प्रशिक्षक राहुल द्रविड निराश झाले होते, त्यामुळे त्याच्या जागी रिद्धिमान साहाला यष्टिरक्षक म्हणून संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर कसोटीत साहाने चमकदार कामगिरी केली. त्यामुळे पंतच्या जागी अनुभवी साहाचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय दुसऱ्या कसोटीदरम्यान सिराजला दुखापत झाली होती ज्यातून तो अद्याप सावरलेला दिसत नाही. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावाच्या दुसऱ्या दिवशी सिराजला हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याने त्याने केवळ 15 षटके टाकली. पण तो लयीत दिसला नाही. प्रभारी कर्णधार केएल राहुल म्हणाला की, मोहम्मद सिराज अद्याप बरा झालेला नाही आणि तो डॉक्टरांच्या देखरेखीत आहे. तो तंदुरुस्त नसल्यास त्याच्या जागी इशांत शर्मा किंवा उमेश यादव यापैकी एकाला संधी मिळू शकते.
तिसऱ्या कसोटीत भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कॅप्टन), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा.