IND vs SA 3rd Test 2022: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार Dean Elgar ने दिले चॅलेंज, केप टाउन कसोटीत ‘या’ रणनीतीने टीम इंडियावर करणार हल्लाबोल
विराट कोहली आणि डीन एल्गर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs SA 3rd Test 2022: केप टाउनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याने मालिकेचा शेवट होणार आहे. दोन्ही संघ सध्या 1-1 अशा बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत हा सामना निर्णायक ठरणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका फत्ते करण्यासाठी मैदानात उतरले तर यजमान संघ देखील गेल्या सामन्यातील विजयाने आत्मविश्वासाने भरपूर असेल. तिसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकी कर्णधार डीन एल्गरने (Dean Elgar) टीम इंडियाला चेतावणी दिला आहे. आणि आपला संघ जिंकेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. यामागचे एक कारण म्हणजे या मैदानावरील भारतीय संघाचा रेकॉर्ड. भारताने या ठिकाणी खेळलेल्या सर्व 5 कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकेला कधीही पराभूत केलेले नाही. त्यामुळे या वेळी एल्गरचा Proteas संघ हा रेकॉर्ड कायम ठेवण्यासाठी उत्सुक असेल. (IND vs SA 3rd Test 2022: विराट कोहलीसह ‘या’ वेगवान गोलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री, केप टाउन कसोटीपूर्वी प्लेइंग-11 वर BCCI ने दिले संकेत)

“मला वाटते की तिसरी कसोटी आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही जोहान्सबर्गमध्ये खेळलो तसा खेळ केला तर आम्ही तिसरी कसोटी जिंकू. केप टाउनमध्ये पेस आमचा प्रिय मित्र असेल”, डीन एल्गरने भारताला सूचकपणे इशारा दिला. तसेच एल्गरला खात्री आहे की दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम कसोटीत भारतीयांना नक्कीच मागे टाकतील. दोन्ही देशांमधील या मैदानावर झालेल्या 5 कसोटी सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी 124 विकेट घेतल्या आहेत, तर फिरकी गोलंदाजांच्या खात्यात केवळ 34 विकेट्स आल्या आहेत. जोहान्सबर्ग कसोटी जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा आत्मविश्वास उंचावला असेल आणि एल्गरला वाटते की त्याच्याकडून आणखी एक खास खेळी त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकेल. “जोहान्सबर्गसारख्या खेळावर प्रभाव टाकणे ही गोष्ट मला नेहमी करायची होती, अगदी मी शाळकरी असतानाही,” एल्गर म्हणाला.

केप टाउनचा न्यूलँड्स पर्वतरांगांनी झाकलेला वेगवान गोलंदाजांसाठी सर्वोत्तम खेळपट्टी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या स्टेडियमवर पाच कसोटी सामने खेळले आहेत. 1993 मध्ये प्रथमच येथे दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता, जो की अनिर्णित राहिला होता. त्यानंतर 1997 मध्ये आफ्रिकन संघाने 282 धावांनी विजय मिळवला. 2007 मध्ये पुन्हा Proteas ने भारताचा पाच गडी राखून पराभव करून वर्चस्व गाजवले. तर 2011 मध्ये टीम इंडिया सामना ड्रॉ करण्यात यशस्वी ठरली होती, पण 2018 मध्ये त्यांना 72 धावांनी पराभव पत्करावा लागला होता.