माजी Bigg Boss स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजच्या बहिणीला डेट करतोय दीपक चाहर? जाणून घ्या ‘ती’ कोण आहे
सिद्धार्थ भारद्वाजच्या बहिणीच्या प्रेमात दीपक चाहर (Photo Credit: Instagram)

Deepak Chahar Dating Siddharth Bharadwaj Sister: क्रीडा आणि ग्लॅमरचे जग यांच्यातील संबंध काही नवीन नाही. अनुष्का शर्मा ते गीता बसरा सारख्या बॉलिवूड अभिनेत्री क्रिकेटपटूंसोबत सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत, तर अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या रोमान्सच्या चर्चा देखील सामान्य आहेत. यामध्ये आता टीम इंडियाचा (Team India) युवा क्रिकेटपटू दीपक चाहरचे (Deepak Chahar) नावही समोर येत आहे. दीपक चाहर 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम सिद्धार्थ भारद्वाजची (Siddharth Bharadwaj) बहीण जया भारद्वाजला (Jaya Bharadwaj) डेट करत असल्याची चर्चा सामान्य झाली आहे. इतकंच नाही तर तर दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे वृत्त देखील येत आहेत. ETimes च्या अहवालानुसार, दीपक चाहर आणि जया त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. हे जोडपं लवकरच रोका सोहळा करण्याच्या तयारीत आहे. आयपीएल 2021 नंतर दोघेही लग्न करणार आहेत. एवढेच नाही तर दुबईत होणाऱ्या आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये जया दीपकसह चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) चीअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.

दीपक चाहर त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यासमोर चांगले दिग्गज फलंदाजी फसतात. दीपक चाहर चेन्नई सुपर किंग्जचा एक भाग आहे. आयपीएल सामन्यादरम्यान, दीपकने त्याच्या प्रभावी खेळाची ओळख अनेक वेळा केली आहे. जया सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. सिद्धार्थ भारद्वाज VJ, मॉडेल आणि MTV Splitsvilla 2 स्पर्धेचा विजेता राहिला आहेत. सिद्धार्थ भारद्वाजने टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉस 5 मध्येही दमदार काम केले होते. 2011 मध्ये झालेल्या या शोमध्ये सिद्धार्थ सेकंड रनर अप राहिला होता. तसेच त्याने फियर फॅक्टर खतरों के खिलाडी 6 मध्येही भाग घेतला होता. दीपक आणि जयाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल खूप उत्साहित आहेत. दुसरीकडे, जया भारद्वाज दिल्लीची रहिवासी असून एका कॉर्पोरेट कंपनीत काम करते.

दीपक आणि जयाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल खूप उत्साहित आहेत. दरम्यान, दीपकचे देखील बॉलिवूडशी जुना संबंध आहे. दीपक मॉडेल आणि अभिनेत्री मालती चाहरचा भाऊ आहे. दीपक हा टीम इंडियाचा उदयोन्मुख खेळाडू आहे. बांगलादेशविरुद्ध 7 धावा देत 6 विकेट्स घेणाऱ्या दीपक चाहरला आयसीसी टी -20 परफॉर्मन्स ऑफ द इयरचा पुरस्कारही मिळाला आहे.