Team India Win Asia Cup 2023 (PC - Twitter)

Team India Win Asia Cup 2023: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने (Team India) आशिया कप 2023 चे विजेतेपद (Asia Cup 2023 Final) पटकावले आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव करत 8व्यांदा हे विजेतेपद पटकावले. या सामन्यात प्रथम खेळताना श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय सामन्यातील आपली दुसरी सर्वात कमी धावसंख्या उभारली आणि 50 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 6.1 षटकांत 10 विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला मोहम्मद सिराज, त्याने 21 धावांत 6 बळी घेतले. जर आपण या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा आणि आघाडीचा विकेट घेणारा खेळाडू याबद्दल बोललो तर, श्रीलंकेचा मथिसा पाथिराना 11 विकेटसह अव्वल स्थानावर राहिला.

कुलदीप यादव ठरला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू

तर दुसरीकडे, मोहम्मद सिराज 5 सामन्यात 10 विकेट घेऊन भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. तर कुलदीप यादवने 5 सामन्यात 9 विकेट घेतल्या आणि तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. याशिवाय, फलंदाजीमध्ये शुभमन गिल 302 धावा करत स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. आता कोणता पुरस्कार कोणाला मिळाला ते एक-एक करून जाणून घेऊया..(हे देखील वाचा: IND vs SL Asia Cup 2023 Final Highlights Video: श्रीलंकेवर मात करत भारताचा विजय, आठव्यांदा पटकावला आशिया चषक; पहा व्हिडिओ हाईलाइट)

कोणता पुरस्कार कोणाला मिळाला?

  • स्मार्ट कॅच आफ द मॅच - रवींद्र जडेजा (3000 US डॉलर अंदाजे 2 लाख 49 हजार रुपये)
  • अंतिम फेरीतील सामनावीर- मोहम्मद सिराज (5000 US डॉलर अंदाजे 4 लाख 15 हजार रुपये)
  • स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू- कुलदीप यादव (15000 अमेरिकन डॉलर अंदाजे 12 लाख 46 हजार रुपये)
  • श्रीलंका क्रिकेट ग्राउंड स्टाफ अवॉर्ड (50000 यूएस डॉलर अंदाजे 41 लाख 54 हजार रुपये)

टीम इंडियाला किती बक्षीस रक्कम मिळाली?

भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली आणि 8व्यांदा आशिया कपचा चॅम्पियन बनला. या स्पर्धेत संपूर्ण संघाला 1 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी 24 लाख 63 हजार रुपयांची बक्षीस टीम इंडियाला मिळाली. तर उपविजेत्या श्रीलंकेच्या संघाला 75 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 62.31 लाख रुपये मिळाले.