India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत-बांगलादेश टी-20 मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू झाली आणि आतापर्यंत भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. भारताने याआधीच मालिका जिंकली असल्याने, शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडिया बांगालदेशचा कसोटीनंतर टी-20 मालिकेत 'सफाया' करणार आहे. (हे देखील वाचा: India vs Bangladesh 3rd T20I: तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशला पराभूत करताच टीम इंडिया मोडणार पाकिस्तानचा घमंड, हैदराबादमध्ये नोंदवला जाणार मोठा विक्रम)
हेड टू हेड आकडेवारी (IND vs BAN T20I Head to Head)
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकूण 16 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 15 सामने जिंकले आहेत, तर एकच सामना बांगलादेश संघाने जिंकला आहे.
Swag ✅
Aura ✅
Attitude ✅
One name has it all: Hardik Pandya! 💥
Happy Birthday to #TeamIndia’s ultimate showstopper! 🥳 Watch his magic in the 3rd #INDvBAN T20I on 12th October 👉🏻 LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex!#IDFCFirstBankT20ITrophy #JioCinemaSports pic.twitter.com/ZK69fk2l7Z
— JioCinema (@JioCinema) October 11, 2024
भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या टी-20 सामन्यातील प्रमुख खेळाडू (Key Players)
सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, मेहदी हसन मिराज, मुस्तफिझूर रहमान, लिटन दास आणि रवी बिश्नोई असे खेळाडू आहेत जे सामन्याचा मार्ग बदलू शकतात.
मिनी बॅटलमध्ये एकमेकांना अडचणीत आणणारे खेळाडू (Mini Battale)
टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा विरुद्ध बांगलादेशचा गोलंदाज तनझिम हसन शकीब यांच्यातील सामना रोमांचक होऊ शकतो. त्याचवेळी लिटन दास विरुद्ध अर्शदीप सिंग यांच्यातील संघर्षाचाही या सामन्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. दोन्ही संघांमध्ये अनेक प्रभावी युवा खेळाडूंसह संतुलित फळी आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश तिसरा सामना कधी अन् कुठे खेळवला जाणार?
भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील पहिला टी-20 सामना 6 ऑक्टोबर (रविवार) रोजी श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर येथे भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
टीव्हीवर अन् ओटीटीवर कुठे पाहणार लाइव्ह सामना?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर विनामूल्य केले जाईल. तसेच, भारतातील Sports-18 नेटवर्क टीव्ही चॅनलवर सामना प्रसारित केला जाईल.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रियान पराग, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा.
बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन, लिटन दास (विकेटकीपर), तौहीद ह्रदोय, मेहदी हसन मिराज, महमुदुल्ला, झकर अली, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, रिशाद हुसेन आणि तन्झिम हसन साकिब.