IND-Women vs SA-Women 1st T20I Live Streaming: एकदिवसीय मालिकेत दणदणीत पराभवाचा सामना करणाऱ्या भारतीय महिला संघाला (India Women's Team) शनिवारीपासून सुरू होणार्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेवर (South Africa) मात कार्याची असल्यास सर्व विभागात चांगली कामगिरी करावी लागेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ संपूर्ण मालिकेत लयीत दिसत होत्या आणि क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटमध्ये टिकवण्याचा प्रयत्न करतील. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि शैफाली वर्माच्या (Shafali Verma) सलामी जोडीकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल तर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) देखील पुढारक घेत नेतृत्व करण्यासाठी उत्सुक असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील पहिला टी-20 सामना लखनौच्या (Lucknow) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 वाजता सामन्याला सुरुवात होईल तर याचे लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल. शिवाय, स्टार स्पोर्ट्स 2/2 एचडी/3 वर प्रेक्षक सामन्याचा लाईव्ह आनंद घेऊ शकतात. (ICC Women's ODI Rankings: भारताच्या Punam Raut ची टॉप-20 महिला वनडे फलंदाज क्रमवारीत एंट्री, Lizelle Lee ची पहिल्या स्थानी झेप)
मार्च 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ पहिल्यांदा छोटा फॉरमॅट खेळण्यासाठी मैदानावर उतणार आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत नेतृत्व सांभाळणाऱ्या भारतीय कर्णधार मंधानासाठी हे निश्चितच कठीण कार्य ठरणार आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेने फलंदाजीमध्ये खरोखरच प्रभावी कामगिरी केली आहे, ज्याने यजमान संघाची डोखे दुखी वाढवली आहे. स्मृती मंधानावर टी-20 संघाची मोठी जबाबदारी आहे कारण ती भारतीय संघाच्या आघाडीच्या लाइन-अपमधील मुख्य घातक फलंदाज आहे. एकदिवसीय मालिकेत ती चांगल्या फॉर्ममध्ये नसली तरी तिने एका सामन्यात 64 चेंडूत 80 धावांची खेळी केली होती त्यामुळे, टी-20 मध्ये भारताला तिच्याकडून पुन्हा अशाच प्रकारच्या खेळीची गरज असेल.
पहा भारत-दक्षिण आफ्रिका महिला टी- संघ
टीम इंडिया: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष, हर्लीन देओल, सुषमा वर्मा (विकेटकीपर), नुजत परवीन (विकेटकीपर), आयुषी सोनी, अरुंधती रेड्डी, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड , पूनम यादव, मानसी जोशी, मोनिका पटेल, सी. प्रत्युषा आणि सिमरन दिल बहादूर.
दक्षिण आफ्रिका: सुने लुस (कॅप्टन), आयबोंगा खाका, शबनीम इस्माईल, लॉरा वोल्वार्ड, त्रिशा चेट्टी, सिनोलो जाफ्ता, तस्मीन ब्रिट्झ, मेरीझान कॅप, नोन्डुमिसो शांगसे, लिझेल ली, अनेके बॉश, फाये टॉनिकलिफ, नॉनकुलुलेको मलाबा, मिग्नॉन डू प्रीझ, नाडाईन डी क्लार्क, लारा गुडॉल आणि तूमी सेखुखून.