IND W VS ENG W 2021: इंग्लंड (England) दौऱ्यावरील भारतीय महिला संघाच्या (India Women's Cricket Team) टी-20 मालिकेच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चेम्सफोर्डच्या (Chelmsford) क्लाउडफॅम काउंटी मैदानावर (Cloudfm County Ground) होणार तिसऱ्या टी-20 सामना प्रसारण उद्देशाने एक दिवस आधी म्हणजे 14 जुलै रोजी खेळला जाणार आहे. यूके दौर्यापूर्वी भारतीय महिला संघ सध्या मुंबईत क्वारंटाईन असून दौर्याची सुरुवात ब्रिस्टल (Bristol) येथे 16 जूनपासून सुरू होणार्या एकमेव कसोटी सामन्याने होईल. तब्बल 7 वर्षानंतर भारतीय महिला टीम व्हाईट जर्सी परिधान करून टेस्ट सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरेल. इंग्लंड क्रिकेटने ट्विटरवर पोस्ट शेअर करून याबाबत अधिकृत माहिती दिली. “प्रसारणाच्या उद्देशाने, क्लाउडफएम काउंटी मैदानावर इंग्लंड महिला आणि भारत महिला यांच्यातील तिसरा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आता बुधवार, 14 जुलै रोजी खेळला जाईल,” इंग्लंड क्रिकेटने ट्विट केले. (India Tour of Australia 2021: पर्थच्या WACA स्टेडियमवर रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात ऐतिहासिक पिंक-बॉल टेस्ट, CA कडून वेळापत्रक घोषित)
टी-20 मालिका 9 जुलै रोजी नॉर्थॅम्प्टन येथे सुरू होईल आणि त्यानंतर 11 जुलै रोजी होव येथे दुसरा सामना होईल. यापूर्वी दोन्ही मालिका संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. वनडे मालिकेचा पहिला सामना 27 जून रोजी होईल. 30 जून रोजी दुसरा आणि 3 जुलै रोजी दोन्ही तडाखेबाज संघ तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भिडतील. त्यानंतर, टी-20 मालिका 9 जुलैपासून सुरू होईल. भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. पुरुष आणि महिला दोन्ही संघ 2 जून रोजी पहिल्यांदा एक दौऱ्यावर एकत्र रवाना होईल. बीसीसीआयने चार्टर्ड विमानातून आपल्या दोन्ही संघातील खेळाडूंच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. भारतीय पुरुष संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल खेळेल तर महिला टीम कसोटी मालिकेने दौऱ्याची सुरुवात करेल.
📆 DATE CHANGE 📆
For broadcast purposes, the third Vitality IT20 between England Women and India Women at the Cloudfm County Ground will now be played on Wednesday, 14 July. pic.twitter.com/HHUenUIAuL
— England Cricket (@englandcricket) May 25, 2021
इंग्लंड दौऱ्यावर भारतीय महिला संघाचे संपूर्ण वेळापत्रक
एकमेव कसोटी सामना- 16 ते 19 जून
पहिला वनडे - 27 जून
दुसरा वनडे - 30 जून
तिसरा वनडे - 3 जुलै
पहिला टी-20 - 9 जुलै
दुसरा टी-20 - 11 जुलै
तिसरा टी-20 - 14 जुलै
कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी महिला संघ: मिताली राज (कर्णधार), स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), पुनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमीमह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया (विकेटकीपर) , इंद्राणी रॉय (विकेटकीपर), झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट आणि राधा यादव.
टी-20 साठी भारताची महिला संघ: हरमनप्रीत कौर (कॅप्टन) स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तान्या भाटिया (विकेटकीपर), इंद्राणी रॉय (विकेटकीपर), शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिष्ट, राधा यादव आणि सिमरन दिल बहादूर.