India Tour of Australia 2021: पर्थच्या WACA स्टेडियमवर रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघात ऐतिहासिक पिंक-बॉल टेस्ट, CA कडून वेळापत्रक घोषित
भारतीय महिला टेस्ट (Photo Credit: Twitter/@ICC)

India Tour of Australia 2021: पर्थ (Perth) येथील WACA मैदानावर भारत महिला संघ  (India Women's Team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिला गुलाबी बॉल टेस्ट (Pink Ball Test) खेळणार आहे. 15 वर्षांत उभय संघांमधील हा पहिला कसोटी सामना असेल. तसेच डिसेंबर 2017 पुरूष अ‍ॅशेस कसोटीनंतर WACA येथे पहिल्यांदा कसोटी सामना खेळला जाईल. सप्टेंबर महिन्यात भारतीय महिला टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनाद्वारे याची पुष्टी केली की, “WACA ग्राऊंडवर महिला कसोटी क्रिकेटचा फक्त दुसरा दिवस/रात्र कसोटी सामना खेळला जाईल जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया मल्टी फॉरमॅट मालिकेत आमनेसामने येतील.” एकूणच ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघात नऊ कसोटी सामने खेळले असून ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच पाच सामने ड्रॉ झाले आहेत. (BCCI ची मोठी घोषणा; भारतीय महिला टीम खेळणार पहिला पिंक-बॉल टेस्ट, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रंगणार D/N सामना)

भारतीय महिला संघाचा पिंक बॉलने हा पहिला कसोटी सामना असेल. सध्याच्या बीसीसीआयच्या वितरणाने महिला क्रिकेटकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियाच्या कानाकोपऱ्यातून झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 3 वनडे सामान्यांनी होईल. 19 सप्टेंबर, 22 आणि 24 सप्टेंबर रोजी वनडे सामानाने खेळले जातील. त्यानंतर 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर रोजी एकमेव टेस्ट सामना रंगेल. अखेरीस 7, 9 आणि 11 ऑक्टोबर रोजी तीन टी-20 सामन्यांची मालिका होईल. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियामध्ये अखेरचा सामना अ‍ॅडिलेड येथे खेळला होता. भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मार्च महिन्यातील घरेलू मालिकेनंतर आता इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे ते एक कसोटी, टी-20 आणि वनडे सामने खेळेल. दरम्यान, पुरुष संघातील करार जाहीर झाल्यानंतर महिनाभरानंतर महिला खेळाडूंच्या वार्षिक करारांची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली.

2 जून रोजी भारतीय मालिका संघ पुरुष टीम सोबत इंग्लंडला चार्टर्ड विमानातून रवाना होणार आहे. सध्या दोन्ही संघ मुंबईमध्ये दोन आठवड्यासाठी क्वारंटाईन आहेत. भारतीय महिला टीम अगामी इंग्लंड दौऱ्यावर तब्बल 6 वर्षांनंतर कसोटी सामना खेळताना दिसणार आहे.