BCCI ची मोठी घोषणा; भारतीय महिला टीम खेळणार पहिला पिंक-बॉल टेस्ट, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर रंगणार D/N सामना
पिंक बॉल टेस्ट (Photo Credit: Getty)

सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे जग थांबले आहे, जगातील कित्येक क्रीडा स्पर्धांमध्ये व्यत्यय आला आहे, परंतु बीसीसीआय (BCCI) पुरुष खेळाडूंसोबत महिला क्रिकेटपटूनसाठीही दिनदर्शिका व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी मंगळवारी महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यंदा पहिला गुलाबी बॉल कसोटी सामन्याची घोषणा केली. “महिला क्रिकेटप्रती आमची वचनबद्धता पुढे नेत टीम इंडिया या वर्षाच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलियामध्ये गुलाबी बॉलने (Pink-Ball) पहिला डे-नाईट टेस्टमध्ये (Day/Night Test) खेळेल, अशी घोषणा करताना मला आनंद होत आहे,” असे शाह यांनी ट्विटरवर लिहिले. भारतीय महिला संघ (India Women's Team) इंग्लंडविरुद्ध (England) एका कसोटी सामन्यासाठी इंग्लंडला लवकरच रवाना होणार आहे. (इंग्लंड दौऱ्यानंतर सप्टेंबरमध्ये भारतीय महिला टीम ‘या’ देशाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता, टी-20 व वनडे मालिकेचा रंगणार थरार)

इंग्लंडला जाण्यासाठी बीसीसीआयने पुरुष तसेच महिला खेळाडूंसाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली होती. सोमवारी मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयच्या महिला संघासाठी चार्टर्ड विमाने उपलब्ध कर्णून देण्यासाठी कौतुक केले. याशिवाय, बीसीसीआयने सोमवारी महिला संघासाठी नवीन वार्षिक कराराची घोषणा केली. हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि लेगब्रेक गोलंदाज पूनम यादव या तीनही फॉरमॅटमध्ये खेळणारे क्रिकेटपटूंचा ग्रेड ए करारामध्ये आहेत ज्यांची वार्षिक फी 50 लाख आहे. उदयोन्मुख सलामी फलंदाज शेफाली वर्मा यांना बढती मिळाली आणि तिला ब श्रेणी देण्यात आली तर मंडळाने करारबद्ध खेळाडूंची संख्या 22 वरून 19 वर नेली आहे. मिताली राज, झुलन गोस्वामी सोबत अनेक ज्येष्ठ महिला क्रिकेटपटू ग्रेड बी कराराचा एक भाग आहेत ज्यांची वार्षिक फी 30 लाख रुपये आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात एकूण 9 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यात टीम इंडियाला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 4 टेस्ट जिंकले असून 5 सामना ड्रॉ राहिले आहेत. दोन्ही संघात 2006 मध्ये अखेर कसोटी सामना रंगला होता. मागील वर्षी भारतीय पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा परदेशी भूमीवर गुलाबी बॉलने कसोटी सामना खेळला होता.